#अत्यंत दुःखद बातमी – तिसरीच्या मुलाची शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कविता आणि त्याच्याच वडीलांनी केली आत्महत्या!!

राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीमुळे बळीराजा ची अवस्था अत्यंत वाईट आहे ,  देशाचा अन्नदाता, पोशिंदा असलेला शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतोय।

त्यातच नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला , ही खूपचं दुःखद घटना घडली आहे ।

इयत्ता तिसरीच्या मुलाने शाळेत ‘बळीराजा नको करु आत्महत्या’  ही कविता लिहिली आणि नेमके त्याचं रात्री त्याच्याच वडीलांनी आत्महत्या केली। अहमदनगर जिल्ह्यात असणार्‍या पाथर्डी तालुक्यात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.

पाथर्डी तालुक्यात भारजवाडी या ठिकाणी हनुमाननगर येथे तिसरीच्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकत आहे . प्रशांत ने बुधवारी 26 फेब्रुवारी ला शाळेत ‘अरे बळीराजा नको करु आत्महत्या’ ही कविता सादर केली होती  पण त्याच रात्री त्याचे वडीलांनी मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष पिऊन आत्महत्या केली.मल्हारी  यांच्यावर बँकेचे कर्ज होते, व यावर्षी शेती बरेच नुकसान झाले त्यामुळे त्यांनी विष घेतले, यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचे सावट कोसळले आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: