#कोणी मटन देता का मटन ????

कोणी मटन देता का मटन ????

एक परिचयाचा व्यक्ती आहे,  गंगाराम।

तो एका आँफिसात शिपाई पदावर कामाला आहे, व आपल्या इमानदारी व कर्तव्यनिष्ठेसाठी तो सर्वांना परिचित आहे।

गंगारामची लहानपणापासून एक सवय आहे ती म्हणजे त्याला मटन खाण्याचा लय भारी शौक आहे, त्याला रोज रात्री खायला मटन, चिकन किंवा मच्छी असलं काहीतरी लागतचं , यामुळे तो आपला सगळा पगार खाण्यापिण्यात उडवून टाकतो, बाकी त्याला कसलीही चिंता नाही।

तो आपल्या बायकोला कधीही मारत नाही किंवा काही बोलतही नाही पण त्याच्या या मांसाहारी खाण्याच्या सवयीमुळे बायको खूप वैतागली होती,  दुसरे म्हणजे गंगाराम नुसता खाण्यापिण्यात मशगूल राही त्यामुळे त्याचा पगार घरी पुरत नसे म्हणून बायको काही ठिकाणी स्वयंपाकाची कामे करून आपले घर चालवित असे ।

पण तरीही त्याची बायको माया गंगाराम ला काही म्हणत नसे कारण तिचा नवर्‍यावर लय जीव होता।

एके दिवशी माया आजारी पडली व काही केल्या ठीक होत नव्हती,  त्यामुळे गंगाराम तिला शहरातील मोठ्या नामांकित डाँक्टर कडे घेऊन गेला।

गंगाराम – “डाँक्टर साहेब माया बरी होईल ना? “

डॉक्टर –  “ हो होईल ना,  पण एका शर्थीवर! तिला मांसाहारी जेवणापासून दूर ठेवावे लागेल!  तिला मांसाहारी जेवणाची एलर्जी झाली आहे आणि आता जर तिने  मांस मटण खाल्ले तर तिच्या शरीरावर खाज सुटेल व तिचं मन एका जागेवर राहणार नाही “

गंगाराम माया ला घेऊन घरी आला व त्याने आपल्या बायकोच्या तब्येतीसाठी मांसाहार न खाण्याची निर्णय घेतला ।

पण सुधरेल तो गंगाराम कसला? त्याला मांस खाल्ल्याशिवाय  काही झोपचं येत नव्हती।

काही दिवसांनी माया बरी झाली व गंगाराम नी तिच्यासाठी मांसाहार सोडला याबद्दल ती खूप खुष होती।

पण एक दिवस अचानक गंगाराम झोपेत चालायला लागला व जोरजोराने ओरडू लागला,  “ भाऊ मले कोणी मटन देता का मटन ? असे ओरडू ओरडू त्याने संपूर्ण वस्तीला जागे केले।

मायाला मटनाविणा गंगाराम ची अवस्था बघवत नव्हती व ती स्वतः आपल्या आजारपणामुळे घरी गंगाराम ला त्याच्या आवडीचे नाँनवेज जेवण बनवून देऊ शकत नव्हती,   यावर तिने एक शक्कल लढवली।

मायाने एका परवडणाऱ्या स्वस्त मांसाहारी खाणावळीत गंगारामचा रोज रात्रीचा डबा लावून दिला,  त्यामुळे गंगाराम खुष होता,  मागील सहा महिन्यापासून सर्व काही व्यवस्थित चालले होते।

पण आता चीनमधून आलेल्या कोरोना वायरस मुळे ती स्वस्ती खानावळ बंद पडली कारण कोरोना च्या भीतीमुळे बर्‍याच लोकांनी मांस खाणे सोडले । आता गंगाराम ला एवढा पगार नाही कि तो रोज मोठमोठ्या हाँटेलात जाऊन मांसाहारी जेवण करू शकेल।

म्हणून तो आता कधी कधीच त्याच्या आवडीचे जेवण करतो व बाकीच्या दिवशी असाचं झोपेत बडबडतो –

“ कोणी मटन देता का मटन? “

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: