#चांगलं लिहू शकता काय?  मग ही कला तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते!!

चांगलं लिहू शकता काय?  मग ही कला तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते!!

मित्रांनो आजकाल काही लोक नुसते एखाद्या विषयावर व्याख्यान देऊन लाखों रूपये कमवितात,  तुम्हाला माहिती असेलचं कि हे मोटिवेशल स्पीकर किती पैसे घेतात ते।

लोकांना ज्ञान देण्याचे भरपूर पैसे मिळतात अर्थात त्यांच्याकडे ज्ञान,  टँलेंट असतोच म्हणून तर करू शकतात । या गोष्टीं कोणीही करू शकत नाही , हे तुम्ही मानतचं असाल।

तर आपला मुद्दा असा आहे की आपल्या पैकी बरेच लोक हे चांगलं लिहू शकतात व त्यांना एखाद्या विषयावर चांगलं ज्ञान असतं त्यामुळे ते एखादे पुस्तक लिहून चांगले पैसे कमवू शकतात।

आता तुम्ही म्हणाल कि आमच्या कडे पुस्तक पब्लिश करायला पैसे नाहीत अमुक तमुक,  तर भावांनो तुम्हाला एक पण रूपया खर्च येणार नाही अशी एक भन्नाट गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे।

तर अँमेझान ही इ-कामर्स कंपनी तुम्हाला ही संधी देते व कुठलेही पैसे न घेता तुमचे पुस्तक आनलाइन स्टोअर वर उपलब्ध ही करून देते म्हणजे तुम्ही लिहीलेले पुस्तक डायरेक्ट अँमेझान च्या वेबसाइट व अँपवर दिसेल व तुमच्या पुस्तकाची आनलाईन खरेदी विक्री चालू होईल व तुम्ही घरबसल्या पैसे कमवायला लागाल।

आता हे कसे कराल?  शेवटपर्यंत वाचा आम्ही सगळं समजवून देऊ।

सर्व प्रथम अँमेझान या वेबसाइटवर दोन प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात, पहिला प्रकार  म्हणजे पेपरबँक वर्जन व दुसरा किंडल वर्जन।

जे आपण नाँर्मल पुस्तके वाचतो ती पुस्तके पेपरबँक आणि हार्डबँक या पद्धतीची असतात म्हणजेच ज्या पुस्तकाची कवर व इतर मटेरियल वापरताना प्रकाशक जास्त खर्च करतो त्याला हार्डबँक म्हणतात व पेपरबँक मध्ये थोडी कमी दर्जाची पाने व कवर ठेवले जाते।

म्हणजे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखादी पुस्तक विकत घेतो तेव्हा ते एखाद्या छापील पद्धतीने आपल्या घरी येते व ते एका आपल्या नेहमीच्या पुस्तकाप्रमाणे असते त्याला पेपरबँक असे म्हणतात।

हे पेपरबँक मध्ये पुस्तक छापायला व उपलब्ध करून द्यायला आपल्याला बराच खर्च येईल व एखादा प्रकाशक ही शोधावा लागेल व जर आपण नवीन लेखक असू तर प्रकाशक आपले पुस्तक प्रकाशित करायला भाव खाईल,  म्हणजे नवीन लेखकांना करायला हे थोडं जड जाईल। अँमेझान पेपरबँक वर्जन ही प्रकाशित करते पण ते काही भाषांमध्ये च आहे, जसं इंग्रजी वगैरे।

आता दुसरा प्रकार म्हणजे किंडल वर्जन,  हा प्रकार नवीन लेखकांसाठी चांगला आहे व याला एकही रूपयाचा खर्च नाही व याचा एक फायदा असा आहे कि वाचक आपले पुस्तक कुठलीही वाट न बघता एका झटक्यात वाचू शकतात कारण हे इ बूक असते।

तसे तर इ बुक पब्लिश करणार्‍या खूप वेबसाइट आहे पण अँमेझाँन हे आपल्याला ग्राहक उपलब्ध करून देते त्यामुळे अँमेझान बेस्ट आहे।

आता सुरूवात कशी करायची?

सर्वप्रथम आपल्याला जे पुस्तक लिहायचे आहे ते इ बुक लिहुन घ्यावे,  ते सहज आपण आपल्या भाषेत आपल्या लँपटाँप किंवा मोबाईलवर ही  लिहू शकतो।  नंतर अँमेझानच्या  अँमेझान किंडल (गुगल वर  amazon kdp publish  असे लिहिल्यास ही साइट मिळेल) या साइटवर जावे,  तिथे लाँग इन करून आपले इ बुक पब्लिश करावे,    तिथे भाषा निवडणे,  पुस्तकाला कवर बनविणे असे भरपूर पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे आपले पुस्तक हे खूप आकर्षक दिसते।  किंडल वापरणे खूप सोपे आहे म्हणून इथे काही समजविण्यासारखे जास्त काही नाही ,तुम्हाला स्वतःच समजेल ।

पुस्तक अपलोड केल्यानंतर आपण आपल्या पुस्तकाची किंमत ठरवू शकतो व अँमेझान ला विक्री वर किती टक्के द्यायचे हे ही ठरवायचे तिथे आँप्शन असते।

तिथे डाँलर मध्ये किंमत टाकल्यास ते भारतीय रुपयात कंन्व्हर्ट होते।

आता दोस्तहो तुम्ही म्हणाल कि पुस्तके लिहून कोणी कोट्यधीश होईल का?  पण अच्युत गोडबोले, नामदेवराव जाधव,  चेतन भगत यांसारखे मोठमोठी मंडळी आपल्या लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या सोडुन लिखाणाच्या क्षेत्रात उतरल्या व आज त्यांची पुस्तके बर्‍याच लोकांच्या जीवनात बदल घडवत आहेत।

जर तुमच्यात एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान असेल व लिखाणाची कला असेल तर मनातली भीती काढा व या मैदानात,   तुमचे यश तुमची वाटं बघंतय !!!!

जयहिंद।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: