# राशिभविष्य today

मेष:- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावाचा राहण्याची शक्यता आहे , प्रवासाचे योग संभवतात , लहान मुलांचे नको ते हट्ट पुरवू नका।

आजचा शुभ रंग – पांढरा   


वृषभ:- आज जवळच्या माणसांची भेट होईल,  मोठ्यांशी आदराने वागा,   मनातल्या गोष्टी सांगून मन हलके केल्यास फायदा होईल।

आजचा शुभ रंग  – पांढरा, पिवळा व केसरी


मिथुन:-जास्त तिखट खाणे टाळावे, प्रकृती बिघडणार नाही याची काळजी घ्यावी।

आजचा शुभ रंग  – निळा व पांढरा


कर्क:- आज जास्त कष्टाची कामे आपल्या हातून होण्याची शक्यता आहे पण काळजी करण्यासारखे काही कारण नाही,  युवकांना आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याचे योग आहेत ।

शुभ रंग –  हलके कोणतेही रंग चालतील फक्त भडक कपडे टाळा ।


सिंह:- आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून आर्थिक व्यवहार सावधगिरी ने करावे।  जवळचे लोकं सुद्धा धोका देवू शकतात, म्हणून जरा जपून।

शुभ रंग  –  पिवळा व केसरी।


कन्या:- बहीण भावांशी थोडी कुरबुर होण्याची शक्यता आहे  ,अविवाहित लोकांना स्थळांचा निरोप येण्याची शक्यता।

शुभ रंग  –  हिरवा


तूळ:- मुले घरी येतील व सर्व दिवस आनंददायी असणार आहे,  गाडी चालविताना सावधानता बाळगावी।

शुभ रंग  –  लाल


वृश्चिक:- पाळीव प्राण्यांपासून सावधान रहा,  शक्यतो आवश्यकते पेक्षा जास्त झोपणे टाळावे ।

शुभ रंग  –  नारंगी,  पिवळा, फिकट निळा (आकाशी)

धनु :- जोडीदाराशी थोडी अनबन होईल,  पुरूषांनी पत्नीला वेळ द्यावा,  मित्रांसोबत पार्टी ला जाऊ शकता पण जास्त वेळ मित्रांसोबत घालवू नये। स्त्रीयांना डोकेदुखी ची समस्या उद्भवू शकते।

शुभ रंग – गुलाबी


मकर:- आज बरेच वाद होऊ शकतात,  तोंडावर नियंत्रण ठेवणे गरजेचे,  पैसे येतील त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील।

शुभ रंग  – लाल व पांढरा।


कुंभ:- आळशी स्वभावामुळे नुकसान होईल,  पर्यटन स्थळांना भेट देण्याचा योग आहे,   जोडीदाराचे सुख मिळेल।

शुभ रंग  –  आकाशी


मीन:- आज तुम्हाला माणसांची खरी ओळख पटेल,   लोकांच्या दिखाऊ स्वभावावर न जाता खरी माणसे शोधण्याचा प्रयत्न करा,  जास्त गोड पदार्थ खाणे टाळावीत,  शक्यतो आपल्या वैयक्तिक गोष्टी लोकांना सांगू नये ।

शुभ रंग  –  पिवळा व लाल।

ज्योतिषाचार्य –  श्री गटेश्वर महाराज

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: