#स्वीटी सातारकर  –  काँमेडीसोबत एक अफलातून लव स्टोरी

स्वीटी सातारकर  –  काँमेडीसोबत एक अफलातून लव स्टोरी

अमृता देशमुख लीड रोल मध्ये असलेला मराठी सिनेमा स्वीटी सातारकर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला ।

यामध्ये एक लव स्टोरी असून ती एका काँमेडी जोनर मध्ये रंगविण्यात आली आहे।

आपल्या मुलामुलींच्या आयुष्यात नेहमी असा प्रसंग येतो कि जेव्हा आपल्याला एखादी मुलगी किंवा मुलगा आवडायला लागतो तेव्हा समोरची व्यक्ति आपल्याला दादा किंवा ताई म्हणते व आपला पूर्णतः भ्रमनिरास होतो अशा स्टोरीज प्रत्येकाच्याच आयुष्यात घडत असतील।

अशीच काहीशी कहाणी स्वीटी सातारकर मध्ये पाहायला मिळेल पण इथे थोडा वेगळेपणा आहे कारण इथे शेखर ला दादा म्हणणारी स्वीटी शेखरच्या प्रेमात पडते।

सिनेमाची कथा

तर स्वीटी ही एक बिनधास्त स्वभावाची मुलगी सिनेमाच्या नायकासोबतच (ज्याचं नाव सिनेमात शेखर आहे) मोठी झालेली असते व लहानपणापासूनच त्यांच नातं एका भावाबहिणीच्या नात्याप्रमाणे असते, स्वीटी त्याला शेखर दादा असेच म्हणत असते पण जेव्हा ती मोठी होते व काँलेजात जायला लागते तेव्हा तो तिला आवडायला लागतो।

स्वीटी चा स्वभाव तापट असतो व तिच्या विरूद्ध स्वभावाचा म्हणजे शांत असणारा शेखर तिच्या हृदयात घर करून जातो।

आता स्वीटी ची जरी शेखरकडे बघायची नजर बदलली असली तरी शेखर मात्र तिला भाव देत नाही व त्यादृष्टीने तो तिच्याकडे बघतच नाही।

दरम्यान शेखरच्या आयुष्यात एक दुसरी मुलगी येते,  आता स्वीटीचं काय होणार?  शेखर स्वीटीला भेटणार का?  हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेलच!

सिनेमाची कथा  आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी मिळती जुळती आहे म्हणून पाहायला मज्जा येते,  सोबतचं काँमेडीचा तडका आहेच।

सिनेमा स्विटी भोवती फिरत असतो व तीच सिनेमाची लीड हिरो आहे ।

सिनेमाचं डायरेक्शन,  म्युझिक बर्‍यापैकी आहे।

पटकथा व कलाकारांची काँमिक टाइमिंग आपल्याला सिनेमाशी बांधून ठेवते।

का पाहावा?

एक मराठी भन्नाट काँमेडी त्यात एकतर्फी प्रेमाचा तडका तुम्हाला निराश करणार नाही,  पैसे नक्की वसूल होतील।

अमृता देशमुख ने स्वीटीच्या भूमिकेत धमाल केली आहे। तिच्याकडे बघून बिनधास्त कंगणा राणावत ची आठवण येते।

रेटिंग

3.5/5

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: