#सावत्रबहिणी असूनसुद्धा एकमेकांवर सख्ख्या बहिणींपेक्षाही जास्त प्रेम करतात या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुली।

सावत्रबहिणी असूनसुद्धा एकमेकांवर सख्ख्या बहिणींपेक्षाही जास्त प्रेम करतात या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुली।

सावत्र बहीण किंवा सावत्र आई म्हटले की लोक थोडं वाईटचं बोलतात कारण आजकाल समाजात एक ट्रेंड निर्माण झालाय की सावत्र भाऊ किंवा सावत्र बहीण आपल्याला त्रासचं देणार इत्यादी।

पण याचवेळी लोकं हेही विसरतात की भगवान श्रीरामाच्या पादुका डोक्यावर घेऊन त्या पादुकांच्या साक्षीने राज्य करणारा राजा भरत हाही एक सावत्र भाऊ च होता पण त्याची आपल्या भावावर किती श्रद्धा व प्रेम होते हे जगजाहीर आहे।

तर उदाहरण द्यायचे कारण की सर्व सावत्र बहीण भावांचे नाते हे वाईट नसते , काही नाते हे सख्ख्या बहीण भावांपेक्षाही चांगले असतात।

बाँलीवुड अभिनेता,  दिग्दर्शक , निर्माता महेश मांजरेकर यांच्या मूलींचे ही एकमेकांवर खूप प्रेम आहे।

महेश मांजरेकर यांचे डिझायनर दीपा मेहता यांच्याशी पहिले लग्न झाले होते या लग्नापासून त्यांना अश्वमी मांजरेकर व सत्या मांजरेकर ही दोन मुले झाली।

अश्वमी प्रोड्युसर आहे तर सत्या हा अभिनेता आहे,  त्याने फू (फन अनलिमिटेड) या चित्रपटात सैराटफेम आकाश ठोसर सोबत काम केले होते।

दीपा मेहता व महेश मांजरेकर काही वर्षांनंतर वेगळे झाले व नंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी लग्न केले।

मेधा व महेश यांना सई नावाची मुलगी आहे जी सलमान खानच्या दबंग 3 मध्ये आपल्याला दिसली होती।

मेधा यांच्या पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगी आहे तिचे नाव आहे गौरी इंगवले,  गौरीसुद्धा अभिनेत्री आहे।

तर

अश्वमी, सई आणि गौरी या तिघी बहीणी सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकत असतात व त्यामध्ये त्यांची कमालीची बाँडिंग दिसते।

त्या तिंघींना पाहून त्या सावत्र बहिणी आहेत असं कधीच वाटत नाही।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: