#NO sir# एका शेतकऱ्याने कवितेद्वारे केली पंतप्रधान मोदी सरांना सोशल मीडिया न सोडण्याची विनंती

insta  वर नमो चे फोटू, twitter वर नमो ले फाँलो

Fb, YouTube वर मी नमोचे विडियो पायतो

आता नमो च सोशल मीडिया सोडणार तर

कुणाकडे मी पाहू

नको सोशल मीडिया सोडू गा तू

आमच्या नरेंद्र भाऊ

लयं देशाला हायं गरजं गा तुयी

लाडाच्या नरेंद्र भाऊ

तुनं शहराले स्मार्ट बनवलं

आम्ही बी लयं स्मार्ट झालो

तुनं देशाले डिजिटल केल

आम्ही बी लयं डीजिटल झालो

आम्हाले 4G  त आनलाइन ठेवून

नको तू आँफलाइन जाऊ

नको सोशल मीडिया सोडू गा तु

आमच्या नरेंद्र भाऊ

लयं देशाला हायं गरज गा तुयी

लाडाच्या नरेंद्र भाऊ

टीका करणारे आपलेच हायं

आणं तारीफ करणारे बी आपलेचं हायं

लाइक करणारे आपलेच हायं

आणि डिसलाइक वाले बी आपलेच हायं

चुकलं भुललं माफ करून दे

नको कोणती कमेंट मनावर घेऊ

नको सोशल मीडिया सोडू गा तु

आमच्या नरेंद्र भाऊ

लयं देशाला हायं गरज गा तुयी

लाडाच्या नरेंद्र भाऊ ।।।।

प्रिय पंतप्रधान साहेब , श्री नरेंद्र मोदी सर आपण सोशल मीडिया सोडू नये हीच एक विनंती।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: