#कोरोना वायरस पासून स्वतःला कसे वाचवाल????

कोरोना वायरस पासून स्वतःला कसे वाचवाल????

दोस्तांनो संपूर्ण जगामध्ये कोरोना वायरस ने सध्या धुमाकूळ घातलेला आहे व त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे  वातावरण पसरले आहे।

चीनमधील वुहान प्रांतामधून सुरुवात झालेला हा भयानक वायरस आता जिकडेतिकडे पसरू लागला आहे , म्हणून त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत जरूरी आहे कारण हा कोरोना वायरस माणसाला  सांभाळण्याची संधी देत नाही।  व यामुळे अनेक लोकांचे बळी गेले आहेत।

आता सर्वप्रथम समजुन घेणे महत्त्वाचे आहे कि या वायरस ची लागण कशी झाली तर विशेषज्ञ लोकांचे असे म्हणणे आहे कि चीनमध्ये असलेल्या एका विशिष्ट जातीच्या मुंगीपासून याची लागण झाली,   तर काही लोक साप खाण्यामुळे कोरोनाची लागण झाली असे म्हणतात तर पुन्हा असा एक निष्कर्ष आहे कि वटवाघळे (चमदागड)  चा सूप पिल्याने याची लागण झाली असे म्हणतात।

म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाल्याने या आजाराची लागण झाली असे आपण म्हणू शकतो।

भारतामध्ये ही याचे रूग्ण दिसू लागले आहेत,  आता यासाठी कोणती काळजी घ्यावी।

1  सर्वप्रथम बाहेर निघताना मास्क चा वापर करा जेणेकरुन कोरोनाचे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करणार नाहीत ।

2  हात स्वच्छ धुवा, यासाठी सेनेटाइजर वापरले तर फारच चांगले कारण आपण आपल्या चेहर्‍यावर तोंडावर हात लावत असतो त्यामुळे हातावरचे जंतू सहज शरीरात प्रवेश करू शकतात।

3 फळे, पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्या।

4  बाहेरील व्यक्तीशी भेटताना शक्यतो हात मिळवणे टाळा,  हात जोडून नमस्कार केला तर चालेल।

5 आतापर्यंत च्या पाहणीनुसार जे लोक बाहेर देशांतून येतात त्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण इथल्या रहिवाशांपेक्षा जास्त आहे,  पहिले तर फक्त चीनमधून येणार्‍या लोकांपासून कोरोना पसरण्याची शक्यता जास्त होती पण आता इतर देशांमधून आलेले लोकही कोरोना बाधित होत आहेत ,

म्हणून बाहेर देशांमधून आलेले मित्र, पर्यटक,  आँफिस स्टाफ यांच्याशी भेटताना काळजी घ्यावी कारण कोरोना हा वायरस एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला होतो।

6  सार्वजनिक ठिकाणी जास्त फिरणे टाळा,  जिथे जास्त जमाव दिसतो अशा ठिकाणी शक्यतो सध्यातरी जाऊ नये ।

7 खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल वापरावा।

8 जंगली जनावरांच्या संपर्कात येऊ नये,   

9   आपले घर व आसपासच्या परिसरात स्वच्छता राखा।

10  बाहेर जाताना हातासाठी हँण्ड ग्लोव्हज वापरावे , यामुळे तुमचे हाताला विषाणू येणाचे प्रमाण खूप कमी होईल।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: