#व्यवसाय करायचायं पण पैसे नाहीत?? तर काहीही पैसे नसताना व्यवसायासाठी पैसे जमविण्याचे अत्यंत सोपे 3 मार्ग।

व्यवसाय करायचाय पण पैसे नाहीत?? तर काहीही पैसे नसताना व्यवसायासाठी पैसे जमविण्याचे अत्यंत सोपे 3 मार्ग।

दोस्तांनो आजकाल नोकर्‍या लागणे अतिशय कठीण होऊन बसलं आहे कारण देशाची वाढती लोकसंख्या,  भ्रष्टाचार,  पदभरतीत होणारे गैरप्रकार यामुळे अत्यंत हुशार असलेले तरूणसुद्धा आज बेरोजगार आहेत।

काही ठिकाणी खाजगी क्षेत्रात नोकर्‍या असतात पण तिथे युवकांना अनुभव मागितला जातो,  आता जर पहिलीच नोकरी कोणी देणार नाही तर त्या बिचाऱ्या कडे अनुभव कुठून येणार?

मग काही लोक स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा विचार करतात पण व्यवसायासाठी पैसा कुठून आणणार?  हा प्रश्न त्यांच्यापुढे तग धरुन उभा राहतो।

श्रीमंत बापाची मुले भरपूर पैसा असल्याने नोकरी, व्यवसायात लवकर सेटल होतात पण आपली गरीबांची मुले तीशी ओलांडून सुद्धा इकडेतिकडे भटकत आहेत।

तुम्ही जर कुठे कोणत्या मोठ्या सेमिनार किंवा एखाद्या बिझनेस कोच ला भेटलात तर त्याला विचारा कि ,”सर व्यवसायासाठी पैसा नाही,  कसा जमवू? “  तर तो फोकनाड बिजनेस कोच इकडच्यातिकडच्या थापा मारून तुम्हाला गोल गोल घुमवेल।

पैसेवाल्यांना व्यवसाय करणे तर कोणीही शिकवू शकतो, ज्याच्याजवळ पैसे नाही त्याला जो शिकवेल तो खरा बिजनेस कोच । पण आजकाल सर्व ज्ञानी लोक आपापली दुकाने खोलून बसली आहेत ते तुम्हाला एखाद्या ट्रेनिंग ला बोलावतील,  शिकविण्याचे पैसे घेतील पण तुमच्यातला उद्योजक पैसे नसल्यामुळे जागा होणार नाही।

दुसरीकडे बँका नवीन माणसाला लोन देत नाहीत हे जगजाहीर आहे,  यांच्याबद्दल नव्याने काही सांगायला नको ।

तर आज आम्ही तुमच्यासाठी असे तीन यशस्वी मार्ग घेऊन आलो आहे कि ज्यामुळे व्यवसाय सुरू करताना तुमच्याकडे जरी एकही रूपया नसेल तरी तुम्ही पैसे जमवू शकाल।

आता एका दमात तुम्ही करोडपती तर होणार नाही पण एक

स्वतःचा चांगला व्यवसाय उभारू शकता।

1  जँक मा पॅटर्न।

जँक मा म्हणजे चीनचे प्रसिद्ध उद्योगपती,  जे अलिबाबा या जगप्रसिद्ध कंपनीचे मालक आहेत।

जँक यांना कितीतरी ठिकाणी नोकरीसाठी नकार आले पण त्यांनी हार मानली नाही,  एके ठिकाणी तर जागा असूनसुद्धा त्यांना नोकरीवर घेतले गेले नाही कारण ते त्या नोकरीसाठी योग्य उमेदवार नाहीत असे त्या मुलाखत घेणार्‍यांचे म्हणणे होते।

नंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला व संपूर्ण जगात नाव मोठे केले।

त्यांनी व्यवसायाची सुरूवात करताना पैसे नसल्याने आपल्या 19 मित्रांकडून थोडे थोडे पैसे घेतले व व्यवसाय सुरू केला।

आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे जरूरी आहे कि , काही लोक म्हणतील की आम्ही कोणाला पैसे मागितले तर ते देतच नाहीत,  तर दोस्तांनो तुम्ही व्यवसायाची सुरूवात करताना कोणत्याही एका व्यक्तीकडून जास्त पैसे मागू नका कारण तुम्ही जर गरीब असाल तर साहजिकच आहे कि तुमचे मित्र सुद्धा तुमच्या सारख्या च परिस्थितीचे किंवा कमी अधिक असतील,  म्हणून थोड्या लोकांकडून जास्त पैसे घेण्यापेक्षा,  जास्त लोकांकडून कमी पैसे घ्या।

यामुळे दोन फायदे होतील,  एकतर कमी पैसे मागितले तर सहज मिळतील व जर व्यवसायात नुकसान झाले तर कमी अमाऊंट असल्याने परत मागायला कोणी जास्त लोड देणार नाही।

उदाहरणार्थ – समजा तुम्हाला 1 लाख रूपयांची गरज आहे व तुम्ही 10 मित्रांकडे 10-10 हजार मागितले तर ते लवकर देतील याउलट जर कोणाला तुम्ही डायरेक्ट 1 लाख मागितले तर तो देताना विचार करेल आणि त्याच्याकडे तेवढे असतील तर देईल ना म्हणून छोट्या अमाऊंट वर फोकस करा।

दुसरी गोष्ट व्यवसाय सुरू केल्यानंतर परतफेडीसाठी लोक जास्त टेंशन देणार नाहीत कारण रक्कम छोटी असेल।

आता यासाठी सर्वप्रथम आपल्या शुभचिंतक मित्रांची एक लिस्ट बनवा व असेच लोक लिस्ट मध्ये ठेवा जे खरोखर तुम्हाला मदत करतील,   जर तुम्ही पंचवीशी गाठली असेल तर भरपूर चांगले मित्र असतीलच आणि लागा कामाला।

2   बिल्डर पॅटर्न

ही पैसे जमा करण्याची पद्धत सध्या रियल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते , तर पद्धत अशी आहे कि जो एखादा नवीन रियल इस्टेट डेवलपर असेल व त्याच्याकडे पैसा नसेल तर जो एखादी नवीन अपार्टमेंट किंवा काँम्लेक्स बांधताना ,

एक जाहिरात करून पैसे जमा करतो,  जसे तुम्ही बघितले असेल कि अमुक तमुक रूपयांत 1 बिएचके, 2 बीएचके बुकिंग उपल्ब्ध इत्यादी।

आता लोक जे पहिलेच त्या बनणाऱ्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट किंवा दुकाने एक ठराविक रक्कम देऊन बुक करतात त्यामुळे त्या व्यावसायिकाला पैसा मिळतो व तो त्याच पैशाने समोरचे बांधकाम करतो।

यामुळे तो लोकांना तो त्यांच्याच जवळच्या घेतलेल्या पैशाने घर बांधून देतो व त्यातूनच नफा ही कमवितो । ही पद्धत सगळे च लोक वापरत असतील असे नाही पण बरेच नवीन असलेले उद्योजक ही अँडवांस बुकिंग ची योजना वापरतात। कारण त्यांना पैशाची कमतरता असते।

आता ही पद्धत वापरून तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता,  तर यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्याप्रकारच्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांना विकणार आहात असे ग्राहक तुमच्याकडे तयार लागतील।

समजा तुम्ही जर काजू, बादाम इत्यादी ड्राय फ्रूट विकणार असाल व तुमच्या शहरात ज्याभावाने मिळते त्यापेक्षा तुम्हाला कमी ने विकावे लागेल कारण तुम्ही व्यवसायात नवीन असाल।

आणि त्यासाठी आपल्याला होलसेल नी बाहेरून माल आणावा लागेल तरच तो स्वस्त पडेल।

पहिले तुमचे ग्राहक शोधा जे रेगुलर सुका मेवा खातात, त्यांची लिस्ट बनवून त्यांना सांगा की जी वस्तू तुम्ही इथून ज्या भावाने खरेदी करता त्यापेक्षा कमी भावात मी मिळवून देतो म्हणून।

यामुळे ते लोक तुम्हाला अँडवांस पेमेंट करायला तयार होतील।

समजा तुम्ही 100 लोकांकडून 1000-1000  रूपये जरी घेतले तरी 1 लाख जमा होतील,   नंतर तो माल तुम्ही होलसेल नी बोलविला तर त्याच पैशातून बरेच पैसे तुमच्याकडे वाचतील व काहीही पैसे नसताना तुमचा व्यवसाय सुरू होईल।

यासाठी तुमच्याकडे व्यवसायाची प्रभावी योजना असणे आवश्यक आहे। व्यवसायात लोकांना त्यांचा फायदा दाखवा तरचं ते तुमच्याकडे आकर्षित होतील।

पण यासाठी तुम्ही इमानदार व प्रामाणिक राहणे जरूरी आहे तरच कोणताही ग्राहक तुम्हाला अँडवांस पैसे देईल ।

3  सहकार पॅटर्न

सहकारितेचे क्षेत्र हे खूप मोठे असून या क्षेत्रामुळे मोठेमोठे उद्योग उभे राहिलेले आहेत।

जसे अमूल दूध शेतकर्‍यांच्या दुधापासून बनलेली एवढी मोठी कंपनी।

सहकार म्हणजे कोणतातरी उद्योग स्थापन करण्यासाठी लोकांनी एकत्रित येणे व एकत्रितपणे काम करणे व आलेल्या नफ्यामध्ये सर्वांना काही हिस्सा देणे।

आता या सहकार क्षेत्राचे छोटे यशस्वी उदाहरण म्हणजे बचत गट,  पहिले तर फक्त महिलांचे गट होते पण आता पुरुषांचे ही बचत गट आहेत।

तर समजा आपल्याला व्यवसाय करायचा असेल व पुरेसे पैसे नसतील तर काही समविचारी लोकांना एकत्र करून तुमचा एक बचत गट सुरु करा,  गटाचे बँकेत खाते काढून दर महिन्याला नियमितपणे बँकेत बचत जमा करा।  

जर लवकर व्यवसाय सुरू करायचा असेल तर थोडी जास्त बचत जमा करा,  समजा गटात 15 लोक असतील व दर महिन्याला तुम्ही 1000-1000 रूपये जरी प्रत्येकाने जमा केले तर एका महिन्याला 15 हजार जमा होतील व वर्षाला 180,000 रूपये जमा होतील,  या जमा झालेल्या रकमेवर बँक सुद्धा बर्‍यापैकी लोन देईल,  कारण तुमच्या खात्यात चांगले पैसे असल्यामुळे बँक बिना कटकट करता तुम्हाला लोन देईल।  

जमा पैसे व लोन चे पैसे घेऊन व आपल्या गटातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तुम्ही आपला व्यवसाय सुरू करता व व्यवसायावर जम बसल्यानंतर गटाची व्यवस्थित परतफेड करत रहा, या बचत गटा मुळे इतर सदस्यांनाही समोर फायदा होत राहील ।

जर व्यवहार तुमचे नियमित असतील तर बँक पुन्हा लोन वाढवून देते।

दोस्तांनो अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करून पैसा नसताना उद्योगासाठी पैसे कसे उभारावे हे आपल्या गरीब व होतकरु मित्रांसाठी लिहिलेले आहे, पण यश मिळविण्यासाठी  तुमची व्यवसायाची कल्पना व मेहनत करण्याची तयारीही आवश्यक आहे।

जर तुमच्याकडे ही अश्याच कल्पना असतील तर आपल्या बेरोजगार दोस्तांसाठी तर नक्की लोकांना सांगा व आपल्या देशाला व देशबांधवांना समोर प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी हातभार लावा।

आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा। धन्यवाद।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: