#आज रिलीज झालेला बागी 3

बागी 3

टायगर श्रॉफ च्या बागी सिरीज ची तिसरी पिक्चर बागी 3 आज रिलीज झाली।

यामध्ये टायगर सोबत रितेश देशमुख, श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे  , जयदीप अहलावत मुख्य भूमिकांमध्ये आहेत।

ट्रायगर श्रॉफ  आणि अँक्शन म्हणजे जणू एक नवे समीकरण झाले आहे , व  टायगर चे चित्रपट पाहायला जाताना प्रेक्षक भरपूर अँक्शन चा धमाका बघायला मिळेल हीच आशा ठेवून जातात।

त्यामुळे टायगर श्रॉफ चा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे, तसेच तो हवाई स्टंट सुद्धा उत्तम प्रकारे करत असल्याने लहान मुलांमध्ये ही टायगर श्रॉफ लोकप्रिय आहे।

पण बागी 3 जर या सिनेमा ची गोष्ट केली तर हा चित्रपट लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्यास सपशेल अपयशी ठरला आहे।

‘ वेट्टाई ‘ नावाच्या तमिल चित्रपटाची कथा यामध्ये काँपी करण्यात आली आहे,  या अगोदर तेलगु मध्ये सुद्धा ‘वेट्टाई’ ची स्टोरी काँपी करून सिनेमा बनवण्यात आला आहे।

ओरिजिनल तमिळ चित्रपट आर्या, आर माधवन यांचा आहे तर तेलुगु मध्ये बनलेल्या चित्रपटात नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य हिरो आहे  , हा चित्रपट तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल।

या चित्रपटांमध्ये एक अशी थीम आहे कि मोठा भाऊ पोलिस अधिकारी असतो पण तो स्वभावतः कमजोर असतो तर लहान भाऊ हा मजबूत व अँक्शन हिरो असतो।

त्यामुळे साधा भोळा व कमजोर असलेला मोठा भाऊ जेव्हा संकटात सापडतो तेव्हा लहान भाऊ येऊन त्याला वाचवतो व गुंडांची धुलाई करतो।

तर हीच कथा बागी 3 मध्ये आहे पण त्यामध्ये अजून एक गोष्ट जोडण्यात आली आहे ती म्हणजे  सिनेमात आतंकवाद हा मुद्दा जोडण्यात आला आहे त्यामुळे हिरो दहशतवाद्यांशी कसा लढतो इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील।

सिनेमात जेव्हा नायकाला कथेपेक्षा जास्त महत्व देण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा सिनेमाच्या विलनला जास्तीत जास्त खतरनाक दाखविण्यात येते व सिनेमात आंतरराष्ट्रीय विलनला दाखविण्यात येते।

इथेही सिरियातील दहशतवादी व त्यांच्या कारवाया वर हिरो कसा विजय मिळवेल ही नेहमीच्या पद्धतीचे जुनीच कथा दाखविली आहे ।

सिनेमाची कथा।

एक भारतातील गुंड व्यक्ती येथील लोकांना किडनँप करून तिकडे दहशतवाद्यांकडे सुसाईड बाँम्बर बनायला पाठवत असतो, पण तो प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे इकडे त्याच्यावर कारवाई होत नाही।  

नंतर विक्रम म्हणजे रितेश देशमुखला जेव्हा दहशतवादी पकडून किडनँप करतात तेव्हा  राँनी (टायगर श्रॉफ) तिकडे जाऊन नेहमीप्रमाणे मारामाऱ्या करतो।

बाकी कथेत काहीच नवीन नाही।

कथा एकदम कमजोर आहे।

म्युझिक मध्ये काहीही दम नाही,   जुनीच गाणी रिमिक्स केलेली आहेत।

श्रद्धा कपूर व अंकिता लोखंडे यां सिनेमात आहेत खऱ्या पण त्यांना करण्यासाठी काहीच नाही। त्या असूनसुद्धा नसल्यासारख्याच आहेत।

रितेश देशमुख नुसता राँनी – राँनी असा ओरडत राहतो।

पण रितेश ने त्याच्या परीने चांगली अँक्टिंग केली आहे।

टायगर ने सुद्धा चांगली अँक्शन सीन्स व स्टंट केले पण जर चित्रपटात कथा व्यवस्थित नसेल तर असे सिन फालतू व बिनकामाचे वाटतात।

अहमद खान चं डायरेक्शन एकदम खराब आहे ।

बाँलीवुड वाल्यांनी नवे लेखक व नवीन डायरेक्टर लोकांना संधी द्यावी कारण हे जुने लोकं यांच्याजवळ काहीही नवीन कंटेंट व नवीन आयडीया नसल्यामुळे त्या जुन्याच गोष्टींमध्ये अडकून पडले आहेत।

का पाहावा?

अजिबात पाहू नका,

जर तुम्हाला फक्त टाइमपास करायचा असेल व खिशात जास्त पैसे असतील तरच हा पिक्चर बघायला जा।    व बाहेर कोरोना चा धोका असल्यामुळे अशा फालतु पिक्चर साठी उगीचच सिनेमागृहात जाऊन रिस्क घेऊ नये।

हा चित्रपट रेस 3 आणि ठग्स आँफ हिंदुस्तान पेक्षाही खराब आहे ।

रेंटिग  0/5

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: