# पुन्हा एक नावाजलेली बँक बुडण्याच्या मार्गावर !!

खाजगी क्षेत्रातील नावाजलेली पुन्हा एक बँक बुडण्याच्या मार्गावर आहे।

काही दिवसांपासून भारतातील अनेक बँका चुकीच्या कर्जवाटपा मुळे अनेक संकटांचा सामना करीत आहे व यामुळे बँकाना वाईट दिवस आले आहेत।

काही बँका तर अक्षरशः बंद होण्याच्या मार्गावर आहेत।

बँकाच्या अशाप्रकारच्या समस्या मुळे सरकारने अनेक सरकारी बँकांचे आपापसात एकीकरण केले होते।

सामान्य नागरिक नेहमी रांगेत उभे राहतात पण आपले खाते सरकारी बँकांमध्ये ठेवतात जेणेकरुन की त्यांचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून।

पण सरकारी बँका मध्ये सततची लांब रांगा व कामात होणार्‍या दिरंगाई मुळे श्रीमंत लोक आपले पैसे खाजगी बँक मध्ये ठेवत असतात।

तर खाजगी क्षेत्रातील नावाजलेली बँक असलेली येस बँक सध्या आर्थिक संकटात सापडलेली आहे त्यामुळे या बँकेचे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक परत घेताना दिसत आहेत यामुळे आज शेयर मार्केट मध्ये येस बँकेचे शेअर्स अतिशय कमी किंमतीवर येऊन आदळले आहे।

येस बँकेने मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलेल्या कंपन्या डिफाल्टर झाल्यामुळे बँकेवर ही नामुष्की ओढवली आहे।

रिजर्व बँक व अर्थ मंत्रालयाचे यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: