#बुडण्याच्या मार्गावर निघालेल्या येस बँक ला भारतीय स्टेट बँक वाचविणार!!

खाजगी क्षेत्रातील नावाजलेली बँक येस बँक बुडण्याच्या मार्गावर असताना भारतीय स्टेट बँकेने येस बँकच्या ग्राहकांना दिलासा दिला आहे।

येस बँक खातेदारांचे पैसे बुडणार नसून भारतीय स्टेट बँक येस बँकेत 49% गुंतवणूक करणार असल्याचे भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आलं त्यामुळे सध्यातरी येस बँकेचे खातेदार थोडेसे सुखावले आहे।

काय आहे प्रकरण?

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी डी एच

एफ एल या कंपनीला नियमांना धाब्यावर बसवून सुमारे 3000 कोटी रूपयांचे कर्ज दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे ।

व याच डी एच एफ एल (DHFL) कंपनीने नंतर राणा कपूर यांच्या मुलींच्या मालकीच्या कंपनीला सुमारे 600 कोटी रूपयांचे कर्ज दिले होते त्यामुळे राणा कपूर यांची अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून चौकशी चालू आहे।

राणा कपूर यांनी आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या डी एच एफ एल ला का लोन दिले?

राणा कपूर यांनी काही गैरव्यवहार तर केला नाही ना?  या सर्व बाबींची चौकशी ईडी कडून करण्यात येत आहे।

नुकतेच रिजर्व बँकेने येस बँकेच्या खातेदारांना खात्यातून पैसे काढण्यासाठी काही निर्बंध लावले होते त्यामुळे येस बँकेच्या खातेदारांना आपले पैसे बुडतील याची चिंता होती पण भारतीय स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक येस बँकेत 49%  गुंतवणूक करणार असल्यामुळे खातेदारांना दिलासा मिळाला आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: