#एकेकाळी विष घेऊन आयुष्य संपविण्याचा केला होता प्रयत्न – आज आहे करोडोंची मालकीण #जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने #

आज जागतिक महिला दिवस, नेहमीच महिलांनी सिद्ध केलेले आहे कि त्या पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत । ज्या महिलांना आपल्या घरच्या लोकांचा साथ मिळतो त्या खरचं खूप समोर जातात,  पण ज्या महिलांच्या जीवनात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते, संकटे असतात त्यांना खूप संघर्ष करावा लागतो।

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका अशाच महिलेची कहाणी सांगणार आहोत की जिने शून्यातून विश्व निर्माण केले व आपल्या टीकाकारांना, विरोधकांना आपल्या यशाने उत्तर दिले।

आपले लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात एका व्यावसायिक महिलेची ,तिच्या मेहनतीची, तिच्या जिद्दीची खूप स्तुती केली होती, त्या महिला म्हणजे आदरणीय कल्पना सरोज मॅडम।


महाराष्ट्र राज्यातील एका छोट्याशा गावात कल्पना सरोज यांचा जन्म झाला । कोवळ्या वयात त्यांचे लग्न झाले. लग्न करून त्या सासरी मुंबईत आल्या , त्यांचा नवरा व सासरच्या लोकांसोबत त्या मुंबईच्या झोपडपट्टीत राहत होत्या . नवरा अत्यंत दारुडा असल्यामुळे त्यांना त्रास आणि सासरी मारहाण सुरू झाली.

एक दिवस त्यांचे वडील त्यांना भेटायला गेले असता त्यांना आपल्या मुलीची अवस्था बघवल्या गेली नाही , ते त्यावेळी स्वःताच्या मुलीला ओळखु देखील शकले नाही इतकी कल्पना यांची अवस्था सासरच्या त्रासामुळे बिकट होती. त्यामुळे वडीलांनी त्यांना माहेरी आणले।

त्यांना वाटलं सासुरवास संपला पण आता सगळा गाव कल्पना यांच्या  विरोधात उभा होता. नवरा सोडून आलेली मुलगी म्हणून लोकांनी त्यांना नावं ठेवली. शेवटी या मानसिक त्रासा मुळे त्यांनी विष प्राशन केले.

सुदैवाने या घटनेतून त्या वाचल्या।

पण आपलं  आयुष्य असं लोकांचा विचार करून संपविण्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी जीवनात करून दाखवावे लागेल हा निश्चय करून त्यांनी गावं सोडले।

कामाच्या शोधात मुंबईत पुनरागमन केलं एका कपड्याच्या मिल मध्ये काम करता करता अजून पैसे मिळावेत यासाठी शिवणकाम सुरू केले.  काही काळानंतर पैसे जमा करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला।

केवळ विस वर्षाची असताना कल्पना सरोज यांनी बेरोजगार तरुणांची एक संघटना तयार केली.

नंतर खुप वेगवेगळ्या व्यवसायात नशीब आजमावत गेल्या।

एकदा एका कंपनीचे कामगार त्यांच्या जवळ मदत मागायला आले होते कारण त्यांची कंपनी बंद पडली होती,  कोर्टाने कामगारांना कंपनी चालवण्याचा आदेश दिलेला होता पण कामगारांना ती कंपनी चालवता आली नाही , म्हणून कामगार लोकांनी कल्पना यांना मदत मागितली।

कल्पना सरोज यांनी अथक परिश्रमाने व कष्टाने बंद पडलेली कंपनी सुरू केली आणि पुढे ती कंपनी फायदेशीर पण ठरली.

त्यांनी आपल्या मेहनतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काम करताना व्यावसायिक जगतात वेगळा ठसा उमटवला। व आजही कित्येक तरूण कल्पना सरोज यांना आपला आदर्श मानतात।

कल्पना सरोज यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले.

कल्पना सरोज यांची कथा खूपच प्रेरणादायी आहे। जेव्हा कधी तुम्हाला आयुष्यात नैराश्य गाठेल तेव्हा कल्पना सरोज यांनी किती अडचणीतून आयुष्याला वेगळी कलाटणी दिली याबद्दल थोडा विचार करा।   यामुळे तुमचे नैराश्य एका झटक्यात निघून जाईल पण नुसते कल्पना सरोज यांच्या बद्दल वाचून स्वस्थ बसू नका तर जीवनात त्यांचा आदर्श घेऊन आपले स्वतःचे जीवन प्रगतीपथावर न्या।

जयहिंद, वंदेमातरम।।।।


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: