#बागी 3  स्टोरी

बागी 3  स्टोरी

एक चतुर्वेदी (जँकी श्राँफ) नावाचे  पोलीस इंन्स्पेक्टर असतात,  त्यांना दोन मुले एक विक्रम (रितेश देशमुख)  आणि दुसरा राँनी (टायगर श्रॉफ)।

मोठा मुलगा विक्रम हा अतिशय कमजोर असतो तर लहान मुलगा राँनी हा ताकदीला मजबूत व धष्टपुष्ट असतो त्यामुळे लहानपणापासूनच जेव्हा पण विक्रम संकटात सापडतो तेव्हा तो राँनी ला जोरात राँनी राँनी अशी हाक मारतो व राँनी लगेच हजर होऊन सर्वांना धोपटण्याचे काम करत असतो।

त्याचा एक डाँयलाँग आहे, “ मुझपे आती है तो मै छोड देता हूँ,  लेकिन मेरे भाई पे आती है तो मै फोड देता हूँ। “

एकदा त्यांचे वडील शहरात झालेल्या दंगलीत दंगा करणार्‍या लोकांना रोखण्यासाठी जातात व त्यातचं त्यांना मृत्यू येतो।

त्यामुळे दोन्ही मुलं लहानपणीच अनाथ होऊन जातात,  नंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या वडीलांचे पोलिस दलातील एक सहकारी करतात।

मरता वेळी हाँस्पीटल मध्ये राँनी (टायगर)  चे वडील त्याच्या कडून एक वचन घेतात कि तो आपल्या कमजोर असलेल्या मोठ्या भावाला सांभाळेल व त्याची आयुष्यभर काळजी घेईल।

लव स्टोरी

एकदा राँनी आणि विक्रम सिनेमा बघायला जातात तेव्हा विक्रम हा थोडा इमोशनल असल्यामुळे इंटरवल मध्ये जेव्हा पाँपकार्न घ्यायला येतो तेव्हा सिनेमाच्या इमोशनल सीन मुळे रडत असतो,  हे बघुन जवळ असलेली सिया (श्रद्धा कपूर)  त्याला समजविण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यातच एका गुंडाच्या अंगावर नाश्ता व पाँपकार्न पडतात त्यामुळे तो विक्रम ला थोडी मारहाण करतो,  विक्रम आत बसलेल्या राँनी ला हाक मारतो व राँनी येऊन सर्वांची धुलाई करतो।

त्यामुळे हे सगळं बघुन सिया अतिशय इंप्रेस होते व ती राँनी च्या प्रेमात पडते।

सियाच्या मोठ्या बहीणीचे (अंकिता लोखंडे) लग्न विक्रम सोबत होते,  व  राँनी व सिया अजून एकमेकांच्या जवळ येतात।

अँक्शन स्टोरी

वडीलांच्या जागेवर पोलिसाची नोकरी करण्यासाठी जेव्हा त्यांचे काका म्हणजे जे त्यांचा सांभाळ करतात दोघा भावांना सांगतात,  तेव्हा राँनी  त्याच्यावर सततच्या मारामारी मुळे अनेक गुन्हे दाखल असतात म्हणून तो विक्रम ला नोकरी करायला सांगतो ।

विक्रम पोलिस सब इन्स्पेक्टर बनून  नोकरीवर रूजू होतो।

शहरात एक आयपीएल(जयदीप अहलावत) नावाचा भयानक गुंड असतो त्याचा तिकडे नागरिकांत तसेच पोलिसांत अतिशय दरारा असतो।

एकदा आयपीएल चे गुंड एका व्यक्तीला पोलिस स्टेशनसमोरच जिवंत जाळतात हे बघुन  सुद्धा पोलिस काहीही करत नाहीत।

आयपीएल चा मुख्य धंदा हा लोकांना किडनँप करून सिरियामध्ये त्यांना सुसाइड बाँम्बर बनविण्यासाठी पाठविण्याचा असतो,  थोडक्यात आयपीएल हा एका सिरियन दहशतवादी संघटनेसाठी काम करतो ज्या संघटनेचा म्होरक्या अबु जलाल नावाची व्यक्ती असते।

आयपीएल च्या तावडीत असलेल्या लोकांना सोडवण्याची जबाबदारी विक्रम वर येते तेव्हा  राँनी त्या सर्व गुंडाची धुलाई करून लोकांना सोडवतो व नाव विक्रम चे होते।  विक्रम ला एक दबंग पोलिस अधिकारी म्हणून लवकरच ओळख प्राप्त होते।

नंतर आयपीएल विक्रम ला धडा शिकविण्यासाठी राँनी ला किडनँप करतो कारण त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नसते की विक्रमचे नाव होत असलेले प्रत्येक काम हे राँनी ने केलेले असते।

राँनी पुन्हा आयपीएल च्या सर्व लोकांना धो धो धुतो।

अल्पावधीतच पोलिस खात्यात विक्रम चे खूप नाव झालेले असते त्यामुळे सर्व कठीण केसेस साँल्व करण्यासाठी विक्रम कडे येतात।

व दोघे भाऊ मिळून सर्व बरोबर करतात।

विक्रम च्या तडफदार कामगिरीमुळे भारतीय इंटेलिजन्स संस्था त्याला सिरिया मध्ये एका मिशन वर पाठविते व तिथे गेल्या गेल्या विक्रम ला अबु जलाल चा भाऊ जैदी किडनँप करतो। ही गोष्ट जेव्हा विक्रम राँनी सोबत विडीयो काँल वर बोलत असतो तेव्हाच होते।

आपल्या भावाला वाचविण्यासाठी राँनी सिया सोबत सिरियामध्ये जातो।

तिथे त्याला विक्रम ला शोधण्यासाठी एक मूळचा पाकिस्तानी नागरिक असलेला पाकिटमार व्यक्ती मदत करतो।   

सिरियामध्ये राँनी अबु जलाल च्या दहशतवादी संघटनेला अत्यंत नुकसान पोहोचवितो, हे सगळं काम  आपल्या भावाला शोधायला आलेला एकटा मुलगा करतोयं यावर अबु जलालचा विश्वासचं बसत नाही।

शेवटच्या सीन मध्ये अबु जलाल व त्याचे गुंड राँनी ला खूप मारत असतात,  त्याच्या पोटात लोखंडी सळी घुसविली जाते तेव्हा संपूर्ण चित्रपटात एक अतिशय साधा व कमजोर असलेला विक्रम आपल्या भावाची ही अवस्था बघून खूप चिडतो।

व अबू जलाल व त्याच्या उरलेल्या सर्व साथीदारांना एका विटेने मारू मारू संपवितो, ( इथे रितेश देशमुख चे लय भारी आणि माऊली मध्ये वीटेने गुंडांना मारतो ते सीन आठवतील) ।

हे सर्व बघताना राँनी अत्यंत जखमी अवस्थेत असताना सुद्धा खुष असतो कारण त्याचा कमजोर असलेला भाऊ आज त्याच्यासाठी लढताना पाहून त्याला अतिशय आनंद होतो।

शेवटी राँनी मरण पावलेला आहे असे वाटत असतानाच बेहोश होऊन परत उठलेला अबु जलाल जेव्हा मागुन वार करायला जातो तेव्हा राँनी अचानक उठतो व त्याला संपवितो (नेहमीप्रमाणे)।

या कथेत दोन भावांचे एकमेकांवरचे प्रेम  दाखविण्यात आले आहे।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: