#महाराष्ट्रात ही होऊ शकतो सत्तापालट??

महाराष्ट्रात ही होऊ शकतो सत्तापालट??

काँग्रेसचे युवा नेते व राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मध्यप्रदेश चे राजे ज्यातिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला।

त्यांच्यावर काही लोकं टीका करत आहेत तर काही त्यांचे समर्थन करीत आहेत,  सोबतचं त्यांचे समर्थक 19 आणि 1 अश्या सर्व 20 काँग्रेस आमदारांनी सुद्धा राजीनामे दिल्यामुळे मध्यप्रदेशातील राजकीय उलथापालथ आज होळी च्या दिवशी अत्यंत चर्चेचा विषय ठरला। अजून पुन्हा काही शिंदे समर्थक आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे।

ज्योतिरादित्य शिंदे आता भारतीय जनता पक्षात लवकरच आपल्या समर्थकांसह प्रवेश करण्याची शक्यता आहे।

का नाराज होते ज्योतिरादित्य शिंदे??

ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसच्या व खासकरून राहुल गांधींच्या युवा टीमचा एक महत्त्वाचा हिस्सा होते,  गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मध्यप्रदेश च्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहण्यात येत होते।

पण काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले,  तसेच जोतिरादित्य यांना वेळोवेळी महत्त्व दिल्या गेले नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे। त्यामुळे त्यांनी कदाचित हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे।

केंद्र सरकारने पारित केलेला कायदा CAA  वर सुध्दा ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षापेक्षा वेगळी होती ।

शिंदे यांना  राज्यसभेत उमेदवारी देऊन केंद्रीय मंत्री पद मिळू शकते व शिंदे समर्थक आमदारांना राज्याच्या कॅबिनेट मध्ये महत्त्वाची पदे मिळू शकतात।

ज्योतिरादित्य यांच्या आत्या वसुंधरा राजे या भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्थान मधील महत्त्वाच्या नेत्या असून त्या माजी मुख्यमंत्री आहेत तसेच दुसर्‍या आत्या यशोधरा राजे यासुद्धा भारतीय जनता पक्षात आहेत त्यामुळे शिंदे परिवाराचे भारतीय जनता पक्षाशी असलेले नाते अजून घट्ट झाले असे आपण म्हणू शकतो।

शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसत आहेत।

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यामुळे समोर राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये ही असे धक्के मिळाले तर त्यात काही नवल वाटायला नको।

महाराष्ट्रात शक्य आहे का?

288 सदस्य संख्या असणार्‍या महाराष्ट्रात विधानसभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सत्तास्थापना केली आहे त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळवून सुद्धा सत्तेपासून

दूर राहावे लागले आहे।

तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक मुद्दयावर एकमत होण्यास वेळ लागतो त्यामुळे मध्यप्रदेशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात तर होणार नाही ना?  असे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उद्भवत आहेत।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: