#माफ करा वहीनी,  चुकुन हात लागला!!

माफ करा वहीनी,  चुकुन हात लागला!!

सागर आणि शिल्पा हे नुकतेच लग्न झालेले जोडपे एका अपार्टमेंटमध्ये राहत असत , सागर तसा सुरुवातीला एकटाच राहायचा पण लग्न केल्यावर त्याच्या सोबतीला त्याची पत्नी आली।

सागर तसा दिसायला सावळा होता , सावळा कसलां चक्क  काळाचं तो , पण सरकारी नोकरीत असल्यामुळे बायको त्याला अतिशय सुंदर मिळाली।

शिल्पा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुलगी होती व ग्रृहीणी होती,  ती दिसायला इतकी सुंदर होती कि कुणीही तिच्याकडे एकदा बघितले की तो बघतच राही।

खरं तर शिल्पा ला सागर अजिबात शोभत नव्हता पण पैशासाठी लग्न करतात ना ही गोष्ट तिने आणि तिच्या घरच्यांनी खरी ठरविली होती।

सागर तसा स्वभावाने वाईट नव्हता तो आपल्या सुंदर बायकोची खूप काळजी घेत असे व तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हता।

आपला नवरा आपली इतकी काळजी घेतो म्हणून शिल्पा ला तिचा नवरा हवाहवासा वाटू लागला व ती सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करू लागली।

पण समाजातील लोकं,  सागरचे मित्र हे त्याला इतकी सुंदर बायको मिळाली म्हणजे सरकारी नोकरीचा फायदा असेच म्हणत।  याचा सागरला खूपदा राग येई पण ती गोष्ट खरीपण होतीच ।

तसे आपल्या आजूबाजूचे सर्व लोकं चांगले असतातच असे नाही,  भरपूर लोक असे असतात की त्यांच्या मनात काय चाललयं याची कल्पना ही आपण करू शकत नाही।

काही सागरचे मित्र होते ते लग्न झाल्यापासून सागरच्या घरी भरपूर येणे जाणे करू लागले,  सुरूवातीला जवळून जाऊन जे त्याच्याशी धडं बोलतसुद्धा नव्हते ते लोकं घरी येऊन विचारपूस करू लागले,  त्याला हा अचानक झालेला बदल समजत नव्हता।

तर हे मित्र त्याच्या रूपवान बायको शिल्पाला घरी बघण्यासाठी येत असतं,  सागरची विचारपूस करण्याच्या निमित्ताने थोडे शिल्पाच्या सौंदर्याचे दर्शन त्यांना घडत असे ।

काही दिवसांनी ही गोष्ट सागरच्या लक्षात आली पण त्याने लोड घेतले नाही।

असेच दिवस जाता जाता  होळी आली,  शिल्पा होळी ला गावी जाण्याची जिद्द करू लागली पण सागरला फक्त एक दिवसाच्या धुळवडीची सुट्टी होती म्हणून त्यांचे गावी जाणे रद्द झाले ।

सागर चे काही मित्र याच दिवसाची वाट बघत होते त्यांना होळी च्या निमित्ताने शिल्पाला रंग लावायची संधी मिळणार होती ते ती संधी कोणत्याही परिस्थितीत गमवायची नाही असे ठरवून होते।

धुळवडीच्या दिवशी सकाळी सकाळी होळी मुळे सगळी कडे जल्लोषाचे वातावरण होते,  लोक डीजे च्या तालावर नाचत होते,   सागर आणि शिल्पा होळी खेळत नव्हते तरीसुद्धा काही घराजवळील महिला,  पुरूष येऊन त्यांना रंग लावून जात होते।

होळी असल्यामुळे तेही आनंदाने रंग लावू देत होते व इतरांनाही लावत होते।

दुपारी  सागरला त्याच्या मित्राचा नरेशचा काँल आला व म्हणाला,

नरेश – “ए सागर ये ना इकडे पार्टी करू .”

सागर – “नाही रे जेवण झालयं माझं”

नरेश – “अरे ये ना मस्त वाइन आणली आहे व सर्व जण आहेत आम्ही फक्त तुझीच वाट बघत आहोत “

सागर वाइन चे नाव ऐकून खुष झाला व लगेच नरेश कडे गेला, तो तसा विकत घेऊन पित नसे पण जर कोणी पाजत असेल तर मनाईपण करत नसे।

दारू पिता पिता नरेश ने सागरकडे शिल्पा ला रंग लावण्याची इच्छा व्यक्त केली।

नरेश – “ सागर मी काय म्हणतो,  आम्हाला वहिणीला रंग लावायचा आहे?  हा म्हणजे जर तुझी इच्छा असेल तरच हा! “

नाहीतर तु चिडशील व आपल्या दोस्तीत आडकाठी येईल “

सागर – “अरे तर लावा ना , त्यात विचारायचं काय ? होळी आहे , तुम्ही खुशाल रंगवू शकता शिल्पाला। “

हे ऐकून सर्व मित्रांना आनंद झाला व लागलीच ते सर्व सागरच्या फ्लँटकडे जायला निघाले।

दाराची घंटी वाजताच शिल्पाने दरवाजा उघडला,  सागर सोबत सर्व मित्र दारात उभे होते ।

सर्व दारू प्यायले आहेत हे शिल्पाने बघताच ओळखले व तिने त्यांना बसायला सांगितले ।

काही मित्रांनी आल्या आल्या शिल्पाला रंग लावला व होळी च्या शुभेच्छा दिल्या,  त्यामुळे शिल्पाने ही सर्वांना थोडा थोडा रंग लावून शुभेच्छा दिल्या।

पण शिल्पाला सर्वात जास्त रंग लावण्यास उत्सुक असलेला नरेश सर्वात मागे होता त्यामुळे त्याला रंग लावता आला नाही।

नंतर शिल्पा सर्वांसाठी साठी नाश्ता व फराळाचे आणण्यासाठी किचनमध्ये गेली।

नरेशची शिल्पाला रंग लावायची अजून इच्छा झाली म्हणून तो तिच्या मागे लगेच किचनमध्ये गेला,  इकडे सर्वजण गप्पा करण्यात व्यस्त होते।

किचनमध्ये गेल्यावर नरेशने अचानक शिल्पाला पाठीमागून पकडले व तिला रंग लावू लागला,  शिल्पाला या अचानक झालेल्या आक्रमणामुळे थोडा धक्काच बसला।  

शिल्पाने नरेशला विनंती केली

शिल्पा – “नरेश भाऊजी सोडा आता “

पण नरेश काहीही बोलत नव्हता,  दारूमुळे तो कदाचित शुद्धीवर नव्हता,  त्याने रंग लावता लावता शिल्पाच्या शरीरावर स्पर्श करणे सुरू केले,  व त्याने शिल्पाच्या शरीरावर नको त्या ठिकाणी स्पर्श केला।

शिल्पाने लगेच आरडाओरडा केला व हाँलमध्ये बसलेले सागर व त्याचे बाकीचे मित्र लगेच किचनमध्ये धावत आले ।

सागरने नरेशला चांगलेच झोडपले,   शिल्पा तर रडायलाचं लागली,  ती पुरती घाबरून गेली होती।

नरेश – “ माफ करा वहिनी ,माझा कसलाही वाईट उद्देश नव्हता,  मी तर फक्त रंग लावायला आलो होतो,  वहीनी चुकुन स्पर्श झाला, माफ करा ।

सागर – “ नरेश भडव्या  , पुन्हा जर इकडे दिसलास तर खूप मार खाशील , चालता हो इथून। “

वातावरण तापल्या मुळे सर्व मित्र  तिथून निघून गेले,  त्यांनी घडलेली प्रकाराबद्दल सागरची कित्येकदा माफी मागितली,  नरेश तर सागरच्या व शिल्पाच्या पाया पडला व निघून गेला।

पण शिल्पा त्या दिवशी रात्रभर रडत होती , ती घडलेल्या प्रकारामुळे खूपच घाबरून गेली,  म्हणून ती आता कधीही होळी खेळत नाही ।  कोणाला रंग लावतपण नाही व कोणाला लावूही देत नाही , धुळवडीच्या दिवशी आपल्या बेडरूममध्ये दरवाजा बंद करून ती झोपलेली असते , मग कोणीही येवो दरवाजा उघडत नाही ।

कारण

जेव्हा जेव्हा होळी येते तिला तीच गोष्ट आठवते

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: