#जेव्हा देव एका गरीबाला प्रसन्न होतो !!

लोक नेहमी देवाची पूजा करीत असतात असेच

एकदा चार लोकांनी देवांची खूप तपस्या केली होती त्यामुळे देव त्यांना प्रसन्न झाला या लोकांना आपल्या जीवनात खुप दुःख होते त्यामुळे ते सतत देवाच्या नावाने देवाला कोसत असत कीं तू आम्हाला जीवनात एवढे दुःख का दिले म्हणून?

त्यामध्ये एक गरीब ,एक विद्यार्थी,. एक राजनेता व एक सिनेअभिनेत्री होते ।

गरीब माणसाला त्याच्या घरी अतिशय गरिबी असल्यामुळे तो खूप दुखी होता त्यामुळे तो रोज देवाला कोसायचा ,

दुसरा विद्यार्थी असलेला तरुण खूप हुशार होता पण त्याला प्रेमात धोका मिळाल्यामुळे तो आयुष्यामध्ये खूप डिस्टर्ब झाला होता त्यामुळे त्याचं सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं व तो  त्या मुलीला विसरू शकत नसल्यामुळे आपल्या जीवनाची माती करून बसला होता तोही देवाला रोज कोसायचा ।

तिसरा व्यक्ती एक राजकीय नेता होता तो आपल्या सत्तरी मध्ये होता त्यांने संपूर्ण आयुष्यात नुसता भ्रष्टाचार करून अफाट मालमत्ता जमवली होती त्याने कधीही कोणाचे भले केले नाही पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणात जेव्हा तो 70 वर्षाचा झाला होता तेव्हा त्याच्या घरी मुलांचे पैशासाठी झगडे चालू होते त्याला समाजातील लोक अजिबात इज्जत देत नव्हते कोणीही त्याच्याशी बोलत पण नव्हते, सगळे लोक त्याला चोर चोर म्हणून चिडवायचे ।

चौथी व्यक्ती एक सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री होती ती तिच्या काळात अत्यंत नावाजलेली अभिनेत्री होती पण तिचे आता वय झाल्यामुळे तिला सिनेमात कोणीही काम देत नव्हते तिच्याजवळ स्वतःची अशी कोणीही व्यक्ती नव्हती ।

जवानीच्या काळात तिला लग्नासाठी भरपूर लोकांचे प्रस्ताव आले परंतु तिने करिअर करायच्या नादात लग्न केले नाही त्यामुळे तिला मूलबाळ नव्हते ती आता जीवनात एकाकी पडली होती तिला आपलं असं वाटणारं जवळच कोणीही माणूस नव्हतं त्यामुळे रोज की देवाकडे याबद्दल प्रार्थना करायची माझ्या जीवनामध्ये असं एक तरी माणूस द्यावा की जो मला आपलंसं वाटेल ।अभिनेत्री असल्यामुळे तिने बऱ्याच लोकांसोबत काम केले होते त्यामुळे आता वय झाल्यावर कोणीही तिच्यासाठी तिच्याशी लग्न केले नाही देवाने या चौघांची प्रार्थना ऐकली व त्यांना एकदा भेटायचे ठरवले ।

भेटण्यासाठी देव सर्वप्रथम गरीब माणसाकडे गेला व त्याला त्याची समस्या विचारली ।

तो गरीब माणूस अत्यंत हलाखीचे जीवन जगत होता त्यामुळे तो रोज न चुकता देवाची पूजा करायचा व देवाला आपली परिस्थिती सुधारण्यासाठी विनवणी करायचा ।त्याच्या घरी बायको व दोन मुले होती मुलांच्या शिक्षणासाठी कधी खाण्यापिण्यासाठी पैसे कमी पडत होते त्यामुळे घरात रोज भांडणं व्हायची ।भांडणामुळे तो अत्यंत तणावात असायचा. बायको व मुलांना मारझोड करायचा रोज तो कामावरून घरी परतताना दारू पिऊन येई त्यामुळे त्यांच्या घरी सतत भांडणे असायचे। तो सकाळी उठून रोज देवाकडे प्रार्थना करायचा की माझ्या घरात सुख-समृद्धी नांदू दे ।आमची गरिबी दूर करावी ।

जेव्हा

देव त्याला भेटला तेव्हा देवाने त्याला विचारले की ,

“बोल तुला काय समस्या आहे “

तेव्हा तो म्हणाला की ,

“देवा तू मला एवढे गरीब का बनवले ?माझ्या घरी गरीबीमुळे रोज भांडणे होतात माझी बायको कित्येक दिवसापासून एकच साडी वापरते ,माझी मुलं शिक्षणासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे शिकवणीसाठी माझ्याकडे पैसे नाही ,त्यामुळे माझ्यावर नाराज आहेत। माझ्या घरी कुठल्याही सोयीसुविधा नाही व मी अत्यंत गरीब आहे ,तुला काय मीच भेटलो होतो का गरीब बनवायला ?देवा माझ्यावर काहीतरी मेहरबानी कर व मला श्रीमंत कर “

नंतर त्याला देव म्हणाला,

“ तू जिथे कामावर जातो ज्या कंपनीत काम करतो तिथे तू इमानेइतबारे काम करतो का ?तुला हात पाय सर्व शरीर व्यवस्थित दिले , तुला तुझ्या आई-वडीलांनी  शिक्षण दिले  मग सगळ्या सुविधासोबत तुला एका कंपनीमध्ये नोकरी आहे

तू तिथे आपले काम इमानेइतबारे करतो का?

तू कधी एक्स्ट्रा काम करतो का ?

जर   तुझ्या पगारामध्ये तुझ्या कुटुंबाचे भरणपोषण होत नाही तर मग तू पैसे कमविण्याचे नवीन मार्ग शोधण्याचा थोडासा तरी प्रयत्न केला आहेस का ?

त्यावर तो माणुस म्हणाला ,”नाही “

देव म्हणाला ,

” तू नुसता दारू पिऊन टेन्शनमध्ये दिवस-रात्र मला कोसतो  त्यापेक्षा तू स्वतःच्या प्रगतीसाठी काही नवीन मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला आहेस का ?

उलट तू आपल्या गरिबीमुळे दारू प्यायला लागला, घरी भांडण करायला लागलास त्यामुळे पून्हा तुझा जास्त खर्च व्हायला लागला मग तुझी गरीबी वाढेल की कमी होईल ।

तुला सुदृढ शरीर दिले ,बुद्धी दिली तर त्या गोष्टीचा योग्य वापर करून तू आपली गरिबी मिटवण्याचा प्रयत्न करत नाहीस तर आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी तू मला दोष देतोस ।तुला जर स्वतःची गरिबी मिटवायची असेल तर सर्वप्रथम तुझे चुकीचे सर्व व्यसने सोडून दे जेणेकरून तुझा फालतू चा पैशाचा खर्च होणार नाही त्यानंतर तू जिथे काम करतोस त्या ठिकाणी मन लावून काम कर व सर्वांशी सौजन्याने वाग । कामामध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कर त्यामुळे तू त्या कामात एक्सपर्ट होशील व तुझी किंमत वाढेल ।

वेळ झाला म्हणून घरी येण्यासाठी घाई करु नको आपली सर्व कामे इमाने इतबारे कर त्यामुळे तुला नोकरीत व कामात प्रमोशन मिळेल नवनव्या जबाबदाऱ्या मिळतील व मालक तुझ्यावर खूष होईल किंवा जर तुला त्या कामात काही प्रगती दिसली नाही तर तू तिथून गुण घेऊन स्वतःचा  व्यवसायही चालू करु शकतो त्यामुळे तुझी गरीबी आपोआप दूर होईल मी तुला कधीही माझी पूजा अर्चना करण्यास सांगितले आहे का ? नाही ना ।

तर तुलाच सुदृढ शरीर व एक प्रगत मेंदू दिला आहे त्याचा योग्य वापर कर आणि नैराश्य झटकून टाक अल्पावधीतच प्रगती करशील ।सारखा सारखा माझ्या नावाने बोंबा मारू नको “

हे ऐकून तो  गृहस्थ कामाला लागला त्याने इमानदारीने काम केले व त्याला आपली चूक कळून चुकली तेव्हापासून त्याने देवाला दोष देणे थांबवले व स्वतःची प्रगती  स्वतःच्या हातात आहे हे त्याला कळून चुकले।

नंतर देव त्या विद्यार्थ्याकडे गेला तेव्हा त्याला विचारले ,

“सांग मित्रा तुझी काय समस्या आहे ? “

तेव्हा विद्यार्थी म्हटला,.

देवा मी एका मुलीवर प्रेम केले ती मला सोडून गेली त्यामुळे माझे जीवन संपूर्ण नैराश्यात गेले तू मला चांगली प्रेयसी का दिली नाहीस ?

का माझे जीवन असे नरकात ढकललेस?

माझ्या जीवनात आता कसलेही सुख नाही ,

मला नोकरी नाही व मी अत्यंत दु:खात आहे व त्या मुलीने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आहे व माझे संपूर्ण जीवन आता आता बरबाद झाले आहे तर मी आता काय करू ?

माझ्या जीवनातील दुःख मिटवावे हीच तुला प्रार्थना करतो.”

देव म्हणाला,

“ तुला चांगले शिक्षण मिळाले नाही का?

तुला बुद्धी नाही का?

जर ती मुलगी एखाद्या श्रीमंत मुलासोबत लग्न करत होती तर तू स्वतः श्रीमंत का झाला नाहीस ?

तुला कोणी रोखले होते का श्रीमंत होण्यापासून ?

आणि तू म्हणत आहेस की तुझ्याजवळ कोणती नोकरी नाही तर तू अशी एक पण गोष्ट शिकला नाहीस का ज्याद्वारे तु काही करू शकशील ?

तू प्रेमात एवढा वेडा झाला होतास का की ज्यामुळे तुला आपला भविष्यकाळ कसा जाईल हेही समजले नाही?

जर तुझे प्रेम खरे असते तर तू तिच्यासाठी काहीतरी केले असतेस ,पैसा कमावला असतास. तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला असतास ना.?हो की नाही?

पण तुझ्याकडून हे काहीही झाले नाही त्यामुळे ती मुलगी दुसरीकडे गेली पण मग तू आपल्या चुकांचा तिच्यावर दोष कशाला देतो ?

आताही तुझ्याकडे भरपूर वेळ आहे तर तू दुसऱ्या ला दोष देण्यापेक्षा आपले कार्य योग्यरीतीने करू शकतोस ।

आता समज तु विद्यार्थिदशेत आहेस तर तू चांगले शिक्षण घेऊन चांगला अभ्यास करून मोठ्या पदावर जाऊ शकतोस  ,

आपले उपजत गुण डेव्हलप करून तू एखादी उत्तम व्यावसायिक होऊ शकतोस आणि जर तू खरच चांगल्या मार्गाने जाशील तर तुला कोणी न कोणी तिच्याही पेक्षा जास्त प्रेम करणारी व्यक्ती मिळेल । हो की नाही ?

तु  तिच्या आठवणीत स्वतःला नैराश्यात ढकलत आहेस तिने तुला सांगितले होते काय असे करायला ? नाही ना ?

तुला तर खुश व्हायला पाहिजे की तुझी प्रेयसी अत्यंत सुखात आहे म्हणून ।

तर मित्रा तुझ्या संकटाचे कारण दुसरे कोणीही नाही ,देव नाही, तुझे नशीब नाही किंवा तुझी प्रेयसी नाही तर तुझ्या वाईट अवस्थेला तू स्वतः जबाबदार आहेस त्यामुळे माझी पूजा अर्चना करण्यापेक्षा तू चांगल्या कामाला लाग ,अभ्यास कर स्वतःच्या जीवनाची प्रगती कर व या सुंदर जीवनाचा चांगल्या कामासाठी उपयोग कर व दुसऱ्याला  दोष देणे थांबव ।”

विद्यार्थी हे देवाचे म्हणणे ऐकून त्याचे डोळे उघडले व तो नैराश्यातून बाहेर आला व आपल्या जीवनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा त्यांने निर्धार केला ।

मग देव त्या सत्तरीच्या जवळपास पोहोचलेल्या राजकारणी व्यक्ती कडे गेला।

त्याला विचारले

“तू माझी प्रार्थना केलीस बोल तुला काय समस्या आहे ?”

यावर राजकारणी व्यक्ती म्हणाला

“ देवा मी माझ्या आयुष्यात भरपूर पैसे कमविले माझ्या मुलांसाठी ,परिवारासाठी भरपूर संपत्ती गोळा केली पण आज माझ्या घरात मुलांमध्ये संपत्तीसाठी वाद आहे ,सर्व मुले मला शिव्या घालतात कारण त्यांना वाटते की ,मी त्यांना समान संपत्ती वाटप केली नाही ।

माझ्या एरियातील लोक मला इज्जत देत नाही मला ते चोर म्हणतात ,माझ्याशी कोणीही बोलत नाही मी जीवनामध्ये एकाकी पडलो आहे । माझ्याकडे संपत्ती तर भरपूर आहे पण मानसिक सुख तु मला दिले नाहीस ?असे तु का केलेस ?”

त्यावर देव म्हणाला ,.

”हे बघ मित्रा मी कधीही कोणाशी काहीही करत नाही तुम्हाला जे मानवी जीवन दिलेले आहे त्या आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी करता त्याच गोष्टींचे फळ तुम्हाला कालांतराने मिळते ।

तू मला म्हटलं की तू तुझ्या मुलांसाठी भरपूर पैसा कमावला पण तो पैसा तू योग्य मार्गाने कमविला का ?

तुझा पैसा कमावण्याचा मार्ग चांगला होता का ?

तू तुझ्या मुलांना चांगले संस्कार केलेस का ?

त्यांना कधी तुझा आदर्श घ्यावा असं कधी वाटलं का?

तू म्हणतोस ती तुझ्या क्षेत्रातील लोक तुझ्याशी बोलत नाही तुला ते  चोर म्हणतात ,तर तू कधी त्यांच्या भल्यासाठी काम केले आहेस का ?

त्यांना कभी मदत केली आहेस का ?

एखाद्या गरिबाच्या पोराला शिक्षणासाठी मदत केली आहेस का?

एखाद्या मुलीचे लग्न लावून दिले आहेस का?

तू कधी त्यांच्यासाठी सेवाभावाने काम केले आहेस का ?

नाही ना?

तुला आयुष्यामध्ये सर्व काही दिलं ,पैसा ,मानमरातब पण तू या गोष्टीचा फायदा फक्त स्वतःच्या भौतिक सुखासाठी केलास तू कधीही इतरांचे भले केले नाहीस ,तू कधीही मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिली नाही ,म्हणूनच तुझी मुले ही  पैशासाठी हपापलेली आहेत ,तुझे उरलेले जीवन त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेले आहे ।”

हे ऐकून त्या राजकारणी व्यक्तीचे डोळे उघडले त्याला आपण केलेल्या चुकांची जाणीव झाली व त्याने देवाची माफी मागितली ।

उरलेली त्याच्या आयुष्याची वर्षे त्याने लोकांसाठी ,समाजासाठी काम करण्याचे ठरविले त्यांने समाजातील लोकांना मिळेल ती मदत केली ।कोणाचेही कसलेही काम तो करत होता त्यामुळे त्याची इज्जत पंचक्रोशीत वाढली। लोक त्याला देवासमान म्हणायला लागले ।लोक त्याचा खूप आदर करू लागले, शेवटी त्याला जीवनाचे खरे रहस्य कळले त्याला हे समजले की दुसर्यांसाठी जगण्यातचं खरा जीवनाचा अर्थ आहे।

शेवटी देव ते अभिनेत्रीकडे गेला तिला विचारले,

“ बोल तुझी काय समस्या आहे “

ती म्हणाली ,

“देवा मी माझे जीवन एकाकी जगत आहे ,मला मिळालेलीे सर्व प्रसिद्धी आता काही कामाची नाही ,आजकाल माझ्याकडे कसलेही काम नाही ,माझी नाती संपली आहे ।मला कोणीही जवळचा वाटणारा माणूस नाही त्यामुळे एकाकी जीवन जगत आहे ।मी काय करू ?”

त्यावर देव म्हणाला

“हे .बघ तू भौतिक सुखांमध्ये एवढी उलगडली गेली होतीस की  तुला जमिनीची कल्पनाच उरली नव्हती, माणूस कितीही मोठा झाला तरी शेवटी त्याला मातीतच मिसळावे  लागते । तू प्रसिद्धीच्या झोतात नाती जपणे विसरलीस व आता त्याचा काहीही फायदा होणार नाही तरीपण तू पैसा व  प्रसिद्धी मागे न लागता ,अशा व्यक्तीस जवळ कर ज्या व्यक्तीला तुझी गरज असेल नंतर ती व्यक्ती तुझ्यावर प्रेम करेल व तुला आधार देईल व तुझे नैराश्य निघून जाईल ।”

हे ऐकून त्या अभिनेत्रीचे डोळे उघडले व तिने एका अनाथ मुलाला दत्तक घेतले व त्याचे शिक्षण व सर्व पालनपोषण करू लागली व काही दिवसातच तिला जीवनाचे समाधान मिळू लागले व ती नैराश्यातून बाहेर आली ।

मित्रांनो या जगात असे भरपूर लोक आहेत जे आपल्या जीवनात काही चुका करतात ,मेहनत करीत नाही व दोष  दुसऱ्यांना देतात ,आपल्या वाईट अवस्थेसाठी दुसरी लोकं च जबाबदार आहे असं ठरवतात ।कोणी देवाला दोष देतात तर कोणी नशिबाला दोष  देतात पण खऱ्या अर्थाने जीवन म्हणजे आपण जे  कर्म करतो त्याची  फळे आपण  भोगतो म्हणून देवाची पूजा करण्यापेक्षा आपल्या जीवनात सत्कार्य करावे तीच खरी देवाची पूजा आहे ।

लोकांना मदत करावी,  चुकीची कामे करू नये ,भ्रष्टाचार करू नये ।

लक्षात ठेवा इथे केलेल्या सर्व पापांचा  हिशेब आपल्याला इथेच द्यावा लागतो म्हणून आपण मेल्यानंतर लोकांनी आपले नाव एक चांगला माणूस म्हणून घ्यावे असेच जीवन  आपण जगले पाहिजे ।।।।

धन्यवाद

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: