##फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे काय??होम लोन घेताना …..

ग्रूहकर्ज घेत असताना आपल्याला बँक पैसे परत करताना भरायच्या व्याजाचे दोन पर्याय उपलब्ध करून देते त्यानुसार आपण आपले व्याज कशा पद्धतीने भरायचे हे ठरवू शकतो तर गृह कर्ज घेताना फिक्स इंटरेस्ट व  फ्लोटिंग इंटरेस्ट असे दोन प्रकार असतात तर आता आपण समजून घेऊ की फिक्स्ड  इंटरेस्ट रेट व फ्लोटिंग इंटरेस्ट रेट मध्ये काय फरक आहे ते ।

तर फिक्स्ड इंटरेस्ट म्हणजे

जो व्याजाचा दर कधीही बदलत नाही व आपण गृहकर्ज घेतले तेव्हापासून लोन संपेपर्यंत एकसारखाच असतो त्याला फिक्स्ड  इंटरेस्ट रेट असे म्हणतात ।

फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे काय ????

तर मित्रांनो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज घेतल्यापासून ते संपेपर्यंत च्या काळात कमी-जास्त होणारा इंटरेस्ट रेट ।

तर फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हा एक सारखा किंवा निश्चित नसतो तो नेहमी कमी-जास्त होत राहतो ।

हा फ्लोटिंग रेट कमी जास्त का होतो ????

हे आपण बघू या ।

मित्रांनो आपण ऐकलं असेल की रिझर्व बँक जेव्हा आपल्या रेपो रेट मध्ये काही बदल करते तेव्हा बातम्यांमध्ये आपल्या गृहकर्जाची इ.एम.आय. कमी होणार किंवा जास्त होणार अशा बातम्या येत असतात तर याचा अर्थ असा आहे की बँका रिझर्व बँकेपासून लघुअवधीसाठी किंवा दीर्घ अवधीसाठी साठी कधीकधी कर्ज घेत असतात ते  कर्ज रिझर्व बँक आपल्या  धोरणानुसार देत असते।

त्यामुळे जेव्हा बँक रिझर्व बँक आपले रेपो रेट कमी जास्त करते तेव्हा  बँकांचे  रिजर्व बँकेशी व्यवहार  त्यानुसार होतात

म्हणून व्याजदरात बदल होतो ।  फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हा रिजर्व बँकेच्या पतधोरणावर अवलंबून असल्यामुळे कमी जास्त होतो ।

फिक्स्ड रेट हा कधी पण फ्लोटिंग रेट पेक्षा जास्त असतो त्यामुळे ग्राहकांना फ्लोटिंग रेट स्वस्तात मिळतो पण तो कधीही वाढू शकतो ।

बँक ग्राहकांना कर्ज घेताना वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय देतात जसं की 1) फ्लोटिंग रेट दुसरे 2 )फिक्स्ड रेट. तर तिसरा प्रकार 3)हायब्रीड प्रकार असतो म्हणजे सुरुवातीला व्याजाचा दर काही वर्षे फिक्स्ड असतो व नंतर तो फ्लोट  होत जातो ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: