#माझ्याशी लग्न करशील का रे.????

माझ्याशी लग्न करशील का रे.????

एका मित्राच्या लेखणीतून……………

माझी गर्लफ्रेंड होती अगदी सुंदर व देखणी ।अत्यंत  सोज्वळ व साधी सरळ ,  मी तिच्यावर जवळपास खूप वर्षांपासून प्रेम करत होतो।

आमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि ते प्रेम खूप वर्ष चालले अगदी सिरीयस।

दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो व मला चांगली नोकरी होती त्यामुळे मी तिला सांभाळण्याची जबाबदारी घेण्यास सक्षम होतो या काळात मी तिला कधीही वाईट बोललो नाही किंवा तिच्या व्यक्तिगत आयुष्यात कधी पण ढवळाढवळ केली नाही अर्थातच माझे तिच्यावर खुप प्रेम होते आणि तिचेही होते।

काही दिवसांनी जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा वेगळ्या जातीचा विषय असल्यामुळे तिच्या घरच्यांनी विरोध केला व ती ही संस्कारी असल्यामुळे घरच्यांच्या विरोधात गेली नाही । तिने मला तिच्या घरच्यांशी बोलायचे सांगितले पण त्याचा काही फायदा झाला नाही ।

तिच्या घरचे मानायला तयार नव्हते व ती पण आपल्या घरच्यांचे शब्दाबाहेर जाऊ शकेल एवढी तिची हिम्मत नव्हती। शेवटी ती म्हणाली की आपण पळून जाऊन लग्न करूया पण ती एक कुटुंबात राहणारी मनमिळावू मुलगी असल्यामुळे मला ते चांगले वाटले नाही शिवाय तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी खूप काही केले होते त्यामुळे पळून जाऊन लग्न करणे किंवा इत्यादी गोष्टी मला करायला चांगले वाटले नाही त्यामुळे तो विषय तिथेच बंद केला ।

काही दिवसांनी आम्ही परस्परसंमतीने एकमेकांपासून वेगळे झालो व जवळपास एकमेकांपासून दोन वर्षे दूर होतो पण याकाळात आठवण यायची तरीपण याचा काही फायदा नसल्यामुळे आमचे बोलणे बंद होते नंतर मी नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात गेलो व तिकडे सेटल झालो।

जवळपास दोन ते अडीच वर्षांनी तिची पुन्हा भेट झाली ती नोकरीनिमित्त मी ज्या शहरात राहत होतो तिथेच राहायला आली व एकदा मला मार्केटमध्ये भेटली।

तिला अत्यंत चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती व ती माझ्या ही पेक्षा चांगल्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होती ।

नंतर तिने मला विचारले की ,”.तु माझ्याशी लग्न कर ना ? आपण लग्न करूया आता कोणाला ही विचारायची गरज नाही ,.आणि घरच्यांना  मी सांगून ठेवलयं कि लग्न करीन तर फक्त तुझ्याशीचं म्हणून ।”

पण दरम्यानच्या काळात माझ्या कंपनीत काही  समस्या आल्या व त्यामुळे मला नोकरी गमविण्याची वेळ आली ।

मी बेकार झालो होतो व दुसरी नोकरी सहजासहजी मिळविणे शक्य नव्हते । त्यामुळे मी तिच्याशी लग्न करण्यासाठी टाळले कारण ती चांगला पैसा कमवित  होती व मोठ्या पदावर कार्यरत होती व मी बेकार झालो होतो व खरं बोलायचं तर माझी तिच्याशी लग्न करायची लायकी नव्हती कारण मी तिला काहीही देऊ शकत नव्हतो ।

त्यामुळे मला माझीच शरम यायला लागली ।

तिला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळू शकतो असेच मला वाटायचे व ते खरे होते कारण तिला चांगला सरकरी अधिकारी असलेल्या मुलाचे स्थळ आले होते म्हणून मला असे वाटायला लागले की तिने त्याच्याशी लग्न करावे जेणेकरून त्यामुळे तिचे जीवन चांगलं सुखी होणार होते ।

पण ती माझे ऐकायला तयार नव्हती व मला त्या अवस्थेत सुद्धा स्वीकारायला तयार होती पण माझ्या मनाला ही गोष्ट पटत नव्हती।

एके दिवशी मी असाच गावी निघून गेलो तिकडे जाऊन स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला व तिच्याशी कसलाही कॉन्टॅक्ट ठेवला नाही ।

असाच एकदा घरी सकाळी झोपून होतो त्यावेळी दरवाजाची कडी कोणीतरी वाजवली , मी दार उघडले बघतो तर काय ? समोर ती होती माझी प्रेयसी ।

मला म्हटली -” काय रे तु स्वतः ला माझ्या पेक्षा कमी समजतोच म्हणून तुला मी नको का ? बरं ठीक आहे यासाठीच मी माझी नोकरी वगैरे सर्व तुझ्या साठी सोडून आली,

मला फक्त तु हवा आहेस बाकी काहीही नको, तुझ्या शिवाय जगणं खुप कठीण आहे रे । कर ना रे माझ्या शी लग्न ?”

एवढे बोलून ढसाढसा रडायला लागली, एखादे लहान बाळं हट्ट करते ना तसा तो तिचा हट्ट होता ।

मी तिला जवळ घेतले व शांत केले ।

आम्ही दोघांनी त्याच दिवशी काहीही नसताना सर्व काही सोडून लग्न केले व लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सुद्धा आमचे प्रेम अगदी जसेच्या तसेच आहे।

आज मी माझ्या व्यवसायात खूप यशस्वी झालो आहे व माझ्या कडे सर्व गोष्टी आहेत व या सर्वात व माझ्या जीवनाला यशस्वी करण्यात माझ्या बायकोचा खूप मोठा वाटा आहे, अर्थात सर्व वाटा तिचाच आहे असे म्हणायलाही काही हरकत नाही।

कदाचित मागच्या जन्मी मी खूप मोठे पुण्य केले असणार त्यामुळे इतकी चांगली मला बायको मिळाली।

सुरूवातीला लग्नाला विरोध करणारे माझे सासू सासरे लोकांजवळ आमचा जावई किती चांगला आहे म्हणून माझी स्तुती करतात ,  माझा साळा अगदी एखाद्या मित्राप्रमाणे प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेयर करतो ।

मला असं वाटते कि प्रेम कधीही संपत नाही फक्त ते मनातून व्हायला हवे ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: