#कसलीही जाहीरत न दाखविता कसे करते  whatsapp कमाई??

कसलीही जाहीरत न दाखविता ही कसे करते  whatsapp कमाई??

मित्रांनो आपण बघितले असेल वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर जाहिराती करून या साइट्स भरपूर पैसे कमवित असतात जसे की जेव्हा आपण एखादी युट्युब व्हिडीओ बघतो तेव्हा त्या व्हिडिओ मधून ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यामधून युट्युबला जाहिरात करणाऱ्या कंपन्या कडून पैसे मिळतात त्यापैकी ते पैसे युट्युब काही टक्के व्हिडिओ बनवणाऱ्या ला देतो व त्यातले काही स्वतःजवळ ठेवतो म्हणजे जाहिराती म्हणजे युट्युब च्या कमाईचे साधन आहे ।

अशा बऱ्याच सोशल मीडिया साइट्स जाहिरातींवर पैसे कमावतात, न्युज पेपर, टीव्ही चॅनल हेसुद्धा जाहिरातींवर पैसे कमवितात पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ही व्हाट्सअप हे अत्यंत लोकप्रिय असलेले मँसेजिंग अँप जाहिराती दाखवित नाही तर मग हे कमाई कसे करते ??

मित्रांनो जेव्हापण आपण मोबाईल मध्ये व्हाट्सअप इन्स्टॉल करतो त्यावेळी ते आपल्याला वेगवेगळ्या परमिशन्स मागत असते व सगळ्या terms and conditions ग्राहकांकडून स्विकारले जातात त्यामुळे व्हाट्सअप ग्राहकांची माहिती ,त्यांचे इंटरेस्ट, लोकेशन  इत्यादी माहिती गोळा करत असते।

त्यांच्याकडे एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम असते ती टीम लोकांच्या आवडीनिवडी जाणून घेते ।

यानुसार युजर्स चा एक डेटा बनविला जातो व तो डेटा whatsapp काही कंपन्याना विकत असतो त्यानुसार त्यांना कमाई होत असते ।

उदाहरणार्थ – जेव्हा तुम्ही आपल्या फोनवर एखादी गोष्ट सर्च करता तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याच प्रकारच्या जाहीराती बघायला मिळतील ।

समजा तुम्हाला एखादी घड्याळ घ्यायचे आहे व जर तुम्ही ते एखाद्या शाँपिंग साइट वर बघितले तर त्याच क्षणापासून तुम्हाला तुमच्या फोनवर इतर ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारच्या घड्याळाच्या जाहीराती दिसतील ।

फक्त whatsapp असे रिसर्च करतो असे नाही तर amazon,flipcart, google , facebook अशा सर्व प्रकारच्या साईट युजर्स बद्दल रिसर्च करत असतात व नंतर त्यांच्या आवडीनिवडी नुसार ग्राहकांना जाहिराती दाखविल्या जातात।

जसे तुमच्यापैकी बर् यापैकी लोकांना हा अनुभव आला असेल की  तुम्ही युट्यूब वर एखादी विडियो बघाल तर युट्यूब तुमचा तो इंटरेस्ट नोट करते व तशाच प्रकारचे आणखी विडियो तुमच्या युट्युब स्क्रीनवर दाखविले जातात ।

तर ग्राहक डेटा गोळा करून त्यावर रिसर्च करून तो डेटा जाहिरातींसाठी इतर कंपन्याना विकणे यावर सोशल मीडिया साइट्स भरपूर कमाई करत असतात ।

आता whatsapp ला फेसबुक ने विकत घेतले आहे ,त्याचप्रमाणे इंस्टाग्राम सुद्धा फेसबुक च्या च मालकीचे आहे म्हणून whatsapp वरच्या युजर्सना त्यांच्या फेसबुक व इंस्टाग्रामवर त्यांच्या रूचिनुसार जाहिराती दाखविल्या जातात।

याद्वारे या साइट्स बक्कळ पैसा कमवित असतात ।

फक्त सोशल साइट्स च नाही तर अनेक व्यावसायिक कंपन्या लोकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्यानुसार आपली उत्पादनांच्या जाहिराती लोकांपर्यत पोहोचवित असतात ।

जसे –  जर तुम्ही एखाद्या अँपवर बँक लोन साठी अर्ज किंवा inquiry  कराल तर अजून काही लोन देणार् या संस्थांचे तुम्हाला आपोआप फोन येतात किंवा जर तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटी त अँडमिशन साठी इंटरेस्ट दाखविला तर आपोआपच तुम्हाला अनेक युनिव्हर्सिटी कडून फोन येणे सुरु होईल ।

कधी कधी तर एखाद्या कोर्स साठी entrance exam दिल्यानंतर वेगवेगळ्या महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी चे फोन किंवा मँसेजेस ,इ.मेल्स येणे सुरू होतात ।

तर मित्रांनो एवढी मोठी युजर्स संख्या असलेले whatsapp आपल्या भल्या मोठ्या युजर्स चा रिसर्च करून किती पैसे कमवित असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेलच ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: