#समांतर

स्वप्निल जोशी स्टारर समांतर वेब सिरीज !

नशीब कर्म घडवत नाही तर कर्म नशीब घडवतं

by मराठी सिने रिव्ह्यू  on march 24

समांतर वेब सिरिज

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सतिश राजवाडे यांची समांतर ही वेब सिरिज सगळी कडे चर्चेचा विषय बनलेली आहे .

या सिरिजच्या वेगळ्या विषयामुळे यामध्ये अशी काहीतरी नवीन गोष्ट आहे जी आपल्याला बांधुन ठेवते .

हल्ली वेब सिरिज म्हटल की लोकांच्या मनात येत की काहीतरी अश्लील दाखवतील जे सेंसॉर बोर्ड मान्य करणार नाही त्यामुळे वेब सिरिज बनवलेली आहे असाच समज जास्तीत जास्त लोकांचा असतो व काहीअंशी तो खराही आहेच पण समांतर याला अपवाद आहे , नवरा बायकोचे एक दोन किसिंग सिन सोडले तर याच्यात फार काही अश्लील नाही .


कलाकार सर्व दमदार आहेत पन त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे या सिरिज ची कथा , काही सिरिज आपण मुद्दाम स्किप करु करु बघतो कारण आपल्याला त्यात स्पेशल सिन बघायचे असतात तिथे कथेच काहीही देणघेण नसतं पण समांतर बघताना आपल्याशी अस होणार नाही , याचे सर्वच्या सर्व ९ एपिसोड आपल्याला घट्ट बांधुन ठेवतात व समोर काय होनार आहे याची उत्कंठा प्रत्येक एपिसोड ला शिगेला पोहोचलेली असेल .
कलाकार एकदम दमदार आहेत स्वप्निल जोशी , तेजस्विनी पंडित व जयंत सावरकर यांच्या मुख्य भुमिका आहेत ,  ही वेब सिरिज श्री सुहास शिरवलकर यांच्या समांतर या पुस्तकावर आधारीत आहे .कथा


कुमार महाजन [स्वप्निल जोशी] हा एक नोकरीपेशा व्यक्ती असुन तो आपल्या आयुष्यात दुःखी आहे , तो आपल्या परिवारासाठी काही करु शकत नाही , तो पैसे कमवितो पण त्याच या पगारात भागत नाही , आपल्या बायकोमुलाला सुखी ठेवण्यासाठी तो सतत धडपड करीत असतो , त्याला निमा [तेजस्विनि पंडित] नावाची बायको आहे ती नोकरी करुन कुमारच्या संसारात हातभार लावत असते व एक छोटा शाळेत जाणारा मुलगा आहे .कुमार आपल्या बायको व मुलाला चांगले आयुष्य देण्यासाठी सतत धडपडत असतो पण त्याला यश मिळत नाही , कुमार बद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एक नास्तिक माणुस आहे त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही .एकदा त्याचा मित्र त्याला एका ज्योतिषाकडे घेऊन जातो कुमारची इच्छा नसतानाही तो मित्राच्या आग्रहाखातर जातो .  कुमारच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या ज्योतिष्याकडे जाऊन सुटतील व त्याच्या आयुष्यात काय होणार आहे हे त्याला कळेल असे त्याच्या मित्राला वाटते म्हणुन तो कुमारला ज्योतिष्याकडे घेऊन जातो .


तिकडे गेल्यानंतर नास्तिक असलेला कुमार ज्योतिषाला तेवढा भाव देत नाही पण नंतर जेव्हा ज्योतिषबुवा [जयंत सावरकर] कुमारच्या आयुष्याचा अचुक भुतकाळ सांगतो तेव्हा त्याला ज्योतिषबुवा वर विश्वास होतो . मग ज्योतिषी जेव्हा कुमारचा हात  बघतो तेव्हा तो म्हणतो की हा हात मी आधी कधीतरी बघितला आहे व काही कारणामुळे मी तुला तुझे भविष्य सांगु शकत नाही .   कुमार त्या ज्योतिषावर भयंकर चिडतो पण तो ज्योतिषी त्याच्यासारख्या च हाताची एक पत्रिका दाखवितो जी एका सुदर्शन चक्रपाणी नावाच्या माणसाची असते .


कोण आहे हा सुदर्शन चक्रपानी ??


कुमारला असे वाटते की जरी त्याला त्याचे भविष्य कळले नाही तरी जर तो सुदर्शन चक्रपाणी ला भेटला तर त्याला त्याचे भविष्य कळु शकते कारण सुदर्शन चक्रपाणी हा माणुस ३० वर्षा अगोदर ज्योतिषाला भेटलेला असतो म्हणजे तो आता अंदाजे ६० पेक्षा जास्त वयाचा असणार व त्याचा वर्तमान म्हणजे कुमारचा भविष्यकाळ असेल .सुदर्शन चक्रपाणी च्या पत्त्यावर गेल्यावर त्याला कळते की त्याने कंपनी मध्ये एक फ्राड केल्यामुळे कंपनीने त्याला त्यावेळी कामावरुन  काधुन टाकले होते पण त्याला काढले जात नाही तर पन्हाळा [कोल्हापुर ] ला बदली देण्यात येते .  व अश्याच तंतोतंत गोष्टी कुमारच्या आयुष्यात सुद्धा घडतात . ज्या घरात चक्रपाणी राहात होता तेच घर कुमार ला ही कंपनी कडुन राहायला मिळते .

अखेर माहीती काढता  काढता तो सुदर्शन चक्रपाणी ला शोधतोच व  सुदर्शन त्याला कुमार खरे बोलतो की नाही हे जाणुन घेण्यासाठी दोघेही एकमेकांचा भुतकाळ शेयर करतात व दोघांच्याही बहुतेक गोष्टी एकसारख्या निघतात .सुदर्शन चक्रपाणी नंतर त्याला काही स्वतःच्या डायरीज देतो ज्यामध्ये त्याच्या जीवनात काय काय घडले ते लिहिलेले असते पण ते देताना तो कुमारला काही अटी सुद्धा घालुन देतो.


डायरी मिळाल्यानंतर कुमार ला एक अट असते की तो फक्त एक दिवस अगोदरचेच पान वाचु शकेल म्हणजे आपले भविष्य कर्माने बदलण्याकरीता त्याच्याकडे फक्त एक रात्र असते .


त्या डायरीमुळे कुमारच्या आयुष्यातले प्रॉब्लेम साल्व होतात , त्याचे प्रमोशन होते , त्याची आर्थिक स्थिती चांगली होते पण  शेवटी तो  डायरीचे एक पान खोलतो व तिथेच सिरिज संपते , तिथे काय लिहिले असते ते तुम्हाला सिरिज बघितल्यावर कळेलच  व  या सिरिज चा दुसरा भाग येणार आहे अशाप्रकारे त्याचा अंत करण्यात आला आहे।सुदर्शन चक्रपाणी त्याचा भुतकाळ म्हणजे जो कुमार चा भविष्यकाळ असतो तो डायरी स्वरुपात देताना कुमारला म्हणतो की नशिबाने कर्म नाही तर कर्माने नशीब बदलत असते म्हणुन मी आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तु करु नको व त्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न कर असे तो कुमारला सांगतो .या सिरिज मध्ये ज्योतिष विद्या , भविष्य असे विषय असले तरीही नास्तिकपणा व नशीबापेक्षा कर्म मोठे अशी दुसरी बाजु ही मांडण्यात आली आहे म्हणून ही सिरिज वन साइडेड नाही व कोणताही विचार दिग्दर्शकाने आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही , आपल्या विवेकबुद्धीला जे पटु शकते अश्याच गोष्टी यामध्ये आहेत .   


सर्व कलाकारांनी उत्तम व अव्वल दर्जाचा अभिनय केलेला आहे .

दिग्दर्शक सतिश राजवाडे यांच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच होईल , सतिश राजवाडे यांनी अप्रतिम डायरेक्शन केलं आहे .


समांतर सिरीज का पाहावी ??

सुट्टयांमुळे घरी बोर होत असाल तर एक चांगल मनोरंजन होईल व एक नवीन विषय जो सिनेमात सहसा बघायला मिळत नाही तो बघायला मिळेल .
तसेच  समांतर ही सिरिज मिस कराल तर खुप काही मिस होईल ।


रेटिंग  ४.५/५


MX प्लेयर वर ही सिरिज एकदम निशुल्क उप्लब्ध आहे  व मराठी सोबतच हिंदी , तेलगु व तमिल मध्ये सुद्धा उपलब्ध आहे .

READ MORE ON OUR WEBSITE

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: