#2011 मध्येच साउथमध्ये बनविण्यात आला होता कोरोना वायरस शी मिळताजुळता चित्रपट!!

दक्षिण भारतीय सिनेमा बॉलीवूड पेक्षा किती समोर आहे व ते किती समोरचा विचार करतात हे एका सिनेमावरून कळले।

सध्या संपूर्ण जगात धुडगूस घातलेल्या कोरोना वायरस प्रमाणे एक वायरस या सिनेमात दाखविण्यात आला आहे जो चीन कडून भारतात पसरविण्यात येतो।

मित्रांनो आता न्यूक्लिअर युद्धाचा जमाना गेला आता जगातील अनेक देश जैविक हथियार बनवून दुसर्‍या देशावर हल्ला करतील व त्यांना जैविक संकटात ढकलतील व नंतर पसरलेल्या गंभीर आजारांसाठी स्वतःच औषधे बनवून विकतील व त्यातून बक्कळ पैसा कमवतील अशी काहीसी ही योजना असते।

हा चित्रपट साउथ चा सिंगम स्टार सुर्या व श्रुती हसन यांची मुख्य भूमिका असलेला आहे,  जवळ पास 10 वर्षे अगोदर या चित्रपटाच्या लेखकाने या गोष्टीचा विचार केला तर त्याची किती मोठी दूरदृष्टी असेल।

कथा

प्राचीन काळी चीन मध्ये एक महामारी पसरते व त्यामुळे भरपूर लोक मरत असतात व या बीमारी चे चीन जवळ कुठलेही औषध नसते।

त्याकाळी भारतात बोधीधर्म नावाचे एक साधू असतात , ते अत्यंत ज्ञानी असतात व प्रत्येक औषधीय वनस्पतींचे त्यांना ज्ञान असते तेव्हा त्यांना दुसरे बुद्ध म्हणून देखील संबोधले जाते।

बोधीधर्म हे चीन मध्ये जातात व तेथील लोकांचा इलाज ,औषधेपचार करतात , नंतर त्यांना कपटकारस्थान  करून चीनमध्ये मारण्यात येते।

खूप वर्षांनंतर आधुनिक काळात चीन भारतावर अश्याच प्रकारच्या एक महामारी पसरविण्याचा प्रयत्न करतो व डांग ली नावाच्या एका व्यक्तीला त्यासाठी भारतात पाठविण्यात येते।

यासाठी चीन एका भारतीय शास्त्रज्ञाची मदत घेतो व त्याला 300 कोटी रूपये लाच म्हणून दिली जाते,  डांग ली तो वायरस सर्वप्रथम एका भटक्या कुत्र्यात इंजेक्शन द्वारे सोडतो व नंतर तो गल्लोगल्ली फिरून तो वायरस पसरवितो।

श्रुती हसन ही एक साइंटिस्ट असते व तिचा रिसर्च चा विषय डीएनए असतो,  याद्वारे ती बोधिधर्म च्या वंशजांचे डी एन ए घेऊन बोधीधर्म चे गुण त्यांच्यात आणण्यासाठी प्रयत्न करते म्हणजे जर भारतावर कोणी भविष्यात जैविक हल्ला केला तर बोधिधर्म च्या ज्ञानाचा उपयोग देशाला व्हावा हा यामागचा तिचा उद्देश असतो।

चीनकडुन लाच खाल्लेला  शास्त्रज्ञ या बद्दल डांग ली सांगतो म्हणून ते लोक श्रुती हसन(सुधा) ला मारायच्या मागे लागतात ।

नायक सुर्या हा बोधिधर्म च्या वंशजांपैकी एक असतो व तो सर्कस मध्ये काम करतो,  त्याचा डी एन ए बोधीधर्म च्या डी  एन ए सोबत 83% मिळत असतो म्हणून श्रुती त्याच्या वर प्रयोग करण्याचे ठरविते।

डांग ली ला संमोहन विद्या प्राप्त असते म्हणून तो कोणाचेही मन वळवुन कोणालाही मारायला लावू शकतो ।

डांग ली च्या भितीने ते एका छुप्या पद्धतीने लँब मध्ये सुर्या वर प्रयोग करतात व बोधीधर्म चे चिकित्सा विषयक ज्ञान त्यांना मिळविता येते ।

शेवटी डांग ली चा खात्मा करून ते देशाला या भयानक महामारीपासून वाचवितात।

एक उत्कृष्ट कथा व दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट अव्वल दर्जाचा आहे ।  

निर्माता,  दिग्दर्शक, लेखक यांनी एवढ्या दूरदृष्टी ने या विषयावर कितितरी अगोदरच चित्रपट बनवला यासाठी त्यांचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच।

या चित्रपटाचे नाव चेन्नई vs चाइना असे असून हा युट्यूबवर हिंदीमध्ये उपलब्ध आहे।  तर नक्की बघा।

रेटिंग 5/5

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: