#अशीच परिस्थिती राहिली तर भारत जाऊ शकतो कितीतरी वर्षे मागे… …….

अशीच परिस्थिती राहिली तर भारत जाऊ शकतो कितीतरी वर्षे मागे… …….

कोरोना मुळे  संपूर्ण देशात लाँकडाऊन करण्यात आले आहे,  भारतचं काय तर जगातील बहुतेक देश हे या संकटाशी सामना करीत आहेत ।

सुरुवातीला काही दिवसांसाठी लाँकडाऊन घोषित करण्यात आले होते पण आता ते अजून 21 दिवसांसाठी  वाढविण्यात आले आहे त्यामुळे भविष्यात अजून हा काळ वाढविण्यात येऊ शकतो, भारत सरकार परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहे ।

पण या  लाँकडाऊन मुळे गंभीर परिणाम भारताला व भारतीय अर्थव्यवस्थेला भविष्यात भोगावेे लागतील ,त्याची कारणेही तशीच आहेत ।

भारतामध्ये शेतकरी , शेतमजूर आणि रोज मजुरी करणारे लोक हे भरपूर प्रमाणात आहे व त्यांची आर्थिक परिस्थिती ही विशेष चांगली नाही ।

शेतकरी हा दुष्काळ व कर्जाने त्रस्त आहे ,शेतमजूर शेतकरी दुःखी असल्यामुळे त्यांनाही विशेष काम नाही व जे लोक रोजमजुरी करण्यासाठी स्थलांतर करतात ते ही लॉक डाऊन मुळे आपापल्या घरी परतले आहेत त्यामुळे ज्यावेळी सर्व स्थिती नॉर्मल होईल त्यावेळी या सर्व लोकांच्या समस्या एका झटक्यात सुटणार नाही त्यामुळे पूर्ण भारतीय अर्थव्यवस्था ही कोलमडून पडलेली असेल व भारत कितीतरी वर्ष मागे जाईल ।

नुसती गरीब लोकच नाही तर मोठ्या उद्योगांवर देखील याचे गंभीर परिणाम होतील

बँका व वित्तीय संस्था

बँक वित्तीय संस्था सुरू असल्या तरी त्यांचे व्यवहारांचे  प्रमाण खूप कमी झाले आहे त्यातच तीन महिन्यांची EMI न घेण्याच्या रिझर्व बँकेचे नियमामुळे बँकांना खूप मोठे नुकसान होईल । सर्व परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर त्यांना नुकसान भरून काढण्यासाठी खूप वेळ लागेल त्यातच येणार काळ हा खरीप हंगामाचा असल्यामुळे  नवीन लोन घेण्यासाठी शेतकऱ्यांना  त्रास होईल याची शक्यता नाकारता येत नाही, शेतकऱ्यांसोबत व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकांनाही कर्ज समस्या उद्भवणार ।

हॉटेल उपहारगृहे

या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना खूप नुकसान झालेले आहे त्यामुळे सर्व परिस्थिती नॉर्मल झाल्यावर तिथे काम करणाऱ्या लोकांना वगळण्यात येऊ शकते व त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात कारण झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी हे खाजगी हॉटेल  व रेस्टॉरंट आपल्या नोकरांना, नोकरी करणाऱ्या लोकांना वगळू शकते किंवा कामावरून कमी करू शकतात त्यामुळे भरपूर लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात

ई-कॉमर्स

ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांमुळे भरपूर लोकांना रोजगार मिळाला आहे जसे की डिलिव्हरी बॉय, कुरियर वाले इत्यादी पण या बंदीमुळे त्यांनाही भरपूर नुकसान झालेले आहे व जेव्हा सगळी परिस्थिती बरोबर होईल तेव्हा लोक आपल्या आर्थिक समस्यांमुळे परेशान असतील व त्यामुळे ऑनलाइन खरेदी ही पूर्वीसारखी होणार नाही त्यामुळे या क्षेत्रातही मंदी येऊन नोकऱ्या जाऊ शकतात त्यामुळे येणारी परिस्थिती हे खूप गंभीर असणार आहे

ऑनलाइन फुड सर्विस

स्विगी, झोमॅटो, डोमिनोज यासारख्या अनेक कंपन्या ऑनलाइन फूड सर्विस देऊन त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्रदान केली होती व या क्षेत्रात अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या पण आता निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे या कंपन्यांना भरपूर प्रमाणात नुकसान होतं आहे त्यामुळे  येणाऱ्या काळात तिथे काम करणाऱ्या लोकांची नोकऱ्या वाचतील की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे।

या क्षेत्रातील लोकांनी हॉटेल  व रेस्टॉरंट व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती ,काहींनी स्वतःचे हॉटेल काढले होते व त्यामध्ये काम करणारे असंघटित क्षेत्रातील भरपूर नोकरवर्ग आहे पण आता त्यांचे काम बंद झाले आहे व्यावसायिकांना झालेल्या नुकसानीचा फटका या नोकर वर्गाला निश्चितच बसेल म्हणून या व्यवसायात  परिस्थिती नॉर्मल होण्यास भरपूर वेळ लागेल

ट्रान्सपोर्ट क्षेत्र

आँटोमोबाईल व ट्रान्सपोर्ट या क्षेत्रातील लोकांनाही भरपूर प्रमाणात नुकसान होणार आहे कारण सर्व वाहतूक बंद असल्याने त्यांच्या उत्पन्नात कमालीची घट होईल ।

आँटोमोबाईल हे क्षेत्र तर सुरूवातीपासूनच मंदीच्या सावटाखाली सापडलेले होते त्यामुळे या क्षेत्राला पुनरूज्जीत होण्यासाठी बराच काळ जावा लागेल ।

सरकारी व खाजगी कर्मचारी

जे लोक सरकारी किंवा चांगल्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात त्यांनाही याचा फटका बसू शकतो कारण एप्रिल महिन्यामध्ये मार्च एंडिंग संपल्यानंतर बऱ्याच कंपन्या आपल्या नोकर वर्गाला प्रमोशन देत असतात त्यासोबतच पगारवाढ दिली जाते किंवा मोठमोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या शेयर प्रमाणे पैसाही दिला जातो पण जेव्हा कंपन्यांना आर्थिक नुकसान होईल तेव्हा कर्मचारीवर्गालाही त्याचा निश्चितच फटका बसेल ।

सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना संभाव्य होणारी वेतनवाढ रोखली जाऊ शकते म्हणून संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थे वर किती गंभीर परिणाम होतील हे विचार करूनच अंगावर काटे येतात

सिनेउद्योजक

फिल्म व टेलिव्हिजन क्षेत्रांत काम करणारे निर्माते बँकाकडून लोन घेऊन मोठ्या बजेटचे चित्रपट व टीवी शो बनवित असतात पण आता थेटर्स बंद असल्यामुळे त्यांना ही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे ।  या नुकसानीचा परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या छोटे छोटे कर्मचारी, बँकग्राऊंड डांसर्स , ज्युनियर आर्टिस्ट. ,..स्पाट बाँयज , इत्यादी कर्मचारी वर्गाला होणार आहे कारण यापैकी बहुतांश लोक हे डेली वेजेस पद्धतीने कामाला असतात । त्यामुळे मोठ्या शहरात राहून घर चालविणे त्यांना कठीण होईल ।

या सर्व गोष्टींचा सरकारवर प्रचंड ताण येणार आहे कारण सरकारला प्रत्येक  क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी आपले धोरणात अनेक बदल करावे लागतील व व काही क्षेत्रांना आर्थिक मदत द्यावी लागेल तसेच कर सवलततीतही बदल करावे लागतील यामुळे प्रचंड प्रमाणात सरकार च्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार आहे ।

या सर्व गोष्टींमुळे भारतात बेरोजगारी दर मोठ्या प्रमाणात वाढेल व लोकांना काम मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागू शकतो ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: