#आणि काय हवं सिजन २#प्रिया बापट#उमेश कामत#

वरूण नार्वेकर दिग्दर्शित “ आणि काय हवं “ या वेब सिरीज चा पहिला सिजन मागील वर्षी आला होता

एका लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यातील गमतीजमती ,रोमान्स , काँमेडी व मँरीड लाइफ चे सुख इत्यादी गोष्टी या सिरीज मध्ये बघायला मिळाल्या होत्या ।

उमेश कामत व प्रिया बापट स्टारर या सिरीजचा दुसरा सिजन या वर्षी रिलीज झाला ।

आता लाँकडाऊन च्या काळात सर्वजण घरी बसलेलेच असाल तर हा सिजन mx player वर अगदी निशुल्क बघु शकता ।

तसही वर्षभर नवरा बायको एकमेकांच्या चुका काढत असतात पण हि सिरीज बघाल तर आपलं आपल्या जोडीदाराविषयी प्रेम वाढेल व सोबतच वैवाहिक जीवनातील जगण्याचा आनंदही द्विगुणित होईल ।

कथा

सिजन १

मागील सिजन मध्ये आपण बघितलं की जुई आणि साकेत नवीन फ्लँटमध्ये शिफ्ट होतात व नंतर नवीन कार घेतल्यावर कारला स्क्रँच लागल्यावर अनेक उपाय करूनही ती स्क्रँच जात नाही ,.

साकेत जुईला पुरणपोळी करता येत नाही व त्याच्या आईला खूप छान पुरणपोळी करता येते म्हणून खूप चिडवत असतो म्हणून एकदा जुई साकेतला सरप्राईज देण्यासाठी पुरणपोळ्या  करते व ते खूप छान होते मग साकेत ही गोष्ट आईला जेव्हा फोन वर सांगतो तेव्हा त्याची आई सांगते की मी पुरणपोळी स्वतः करत नव्हती तर बाजारातून विकत आणत होती म्हणून ,.फोन स्पीकर वर असल्याने जुई ही गोष्ट ऐकते व साकेतला सर्व किचन साफ करावे लागते ।

शेवटे दोघेही आपला भूतकाळ व आपल्या एक्स बाँयफ्रेंड गर्लफ्रेंड बद्दल एकमेकांना सांगतात व सहजरित्या एक दुसर्याला समजून ही घेतात । प्रत्येकाला आपले वैवाहिक जीवन असेच असावे हे हि वेब सिरीज बघून वाटेल ।

वजन कमी करण्यासाठी स्वतः बरोबर नवर्याला ही महिनाभर डाएट करायला लावणारी हट्टी बायको व तिच्या प्रेमापोटी ते करणारा नवरा जेव्हा त्याला माहिती पडतं कि बायकोने एक चुकीच्या साइजचा ड्रेस घातल्यामुळे त्याला महिनाभर डाएटिंग करावं लागलं तेव्हा त्याची कीव तर येतेच पण तेवढेच हसूही आवरणे कठीण होते ।

सिजन २

सिजन १ प्रमाणेच सिजन २ सुद्धा अगदी झकास बनलेले आहे ।

जुई जेव्हा आँफिस वर्क साठी दोन- तीन दिवसांसाठी बेंगलोर ला जाते तेव्हा साकेतला बायकोची खूप आठवण येते तो पुन्हा कधीही तिला एकटं जाऊ देणार नाही असं तिला फोनवर म्हणतो । नवरा बायकोच नातं हे असचं असतं जवळ असल्यावर कितीही कुरबूर असली तरी दूर गेल्यावर आपण आपल्या जोडीदाराशिवाय एक क्षणही राहू शकत नाही याची प्रत्यक्षात जाणीव होते ।

एकदा साकेतला तबला वाजविण्याचा छंद लागतो तो छंद इतका लागतो कि तो चक्क झोपेतही तबला वाजवितो हा एपिसोड सुद्धा अगदी मस्त आहे ।

जुईला घरात कुत्रा पाळायचा असतो पण साकेत ला मांजर हवी असते , एकदा त्याचा मित्र बाहेर जाणार असतो तर तो  साकेतकडे आपल्या पाळीव कुत्रा काही दिवसांसाठी ठेलायला तयार होतो , त्या कुत्र्याला बघुन दोघांना खूप आनंद होतो आणि मित्राकडे कुत्र्याबरोबर एक छोटी मांजर सुद्धा असते तिची ही जबाबदारी साकेतला मिळते ।

त्यामुळे दोघांच्या ही इच्छा पूर्ण होतात , हे वाचायला तेवढं चांगलं वाटणार नसलं तरीही हा एपिसोड बघायला खूप छान वाटतो ।

शेवटी जुई साकेतला तिला बाळ हवयं या विषयावर बोलते पण साकेतला बाळ नको असते कारण सध्याची बिघडलेली सामाजिक स्थिती , प्रदूषण यामुळे तो आपल्या बाळाला चांगले आयुष्य देऊ शकेल का ? याबद्दल तो थोडा साशंक असतो पण जुई म्हणते की तू आपल्या मेंदूत उगाचच नकारात्मक गोष्टी भरून ठेवल्या आहेस , माणसाने आयुष्याकडे सकारात्मक द्दष्टीने  बघावे असे जुईचे म्हणणे असते ।

या वेब सिरीज ची कथा , कलाकारांची अँक्टिंग व दिग्दर्शन सर्वच गोष्टी उत्तम जमल्या आहेत ।

हि सिरीज आपल्या जोडीदारासोबत बघा ,.तुमचं प्रेम नक्की वाढेल व जीवन जगताना या छोटछोट्या गोष्टींचा कसा आनंद घ्यायचा असतो हे शिकायला मिळेल ।

रेटिंग  ४.५/५

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: