#तु सोबत असताना

तुझ्या सोबत असताना
कसा वेळ जातो कळतचं नाही
तुझ्या सोबत असताना
दिवस छोटा होतो व रात्र मोठी होते
तुझ्यासोबत असताना

चंद्राला उगवायची खूप घाई असते
तु सोबत असताना
कदाचित तो ही तुझ्या सौंदर्याचा चाहता असेल
विषय छोटा असतो पण गोष्ट मोठी होते
तु सोबत असताना

जेव्हा तु मला आपल्या बाहुपाशात घेतेस
अचानक शरीरात गुदगुल्या करतेस
तो सुवर्ण क्षण होतो
तु जवळ असताना
मनातल्या गोष्टी डोळ्यांच्या इशार्याने होतात
तु सोबत असताना

तु सोबत असताना
स्वप्ने सत्य होतात
ह्दयात न्रुत्य होतात
क्षण थोडे असले तरीही कायम स्मरणी राहतात
तु सोबत असताना

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: