#दोस्ती की दुश्मनी

एका गावात सोनु आणि मोनु नावाचे दोन मित्र राहत होते , दोघेही अत्यंत हुशार होते व त्यांना गावातील लोकांसाठी काहीतरी करावे , गावाचा विकास करावा असे नेहमी वाटायचे ।

एका गावात सोनु आणि मोनु नावाचे दोन मित्र राहत होते , दोघेही अत्यंत हुशार होते व त्यांना गावातील लोकांसाठी काहीतरी करावे , गावाचा विकास करावा असे नेहमी वाटायचे ।

सोनु आणि मोनु हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते पण त्यांच्या त अत्यंत सलोख्याचे संबंध होते , ते एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागत ।

गावातील लोकांसाठी काहीतरी चांगले करायचे इच्छा असलेले हे दोन्ही तरूण गावात विकासाचे राजकारण करू पाहात होते कारण गावात शाळेची अवस्था चांगली नव्हती , आरोग्य व इतर सुविधा ही चांगल्या स्थितीत नव्हत्या , गावातील तरुण मुले जुगार , दारू या व्यसनांच्या आहारी गेलेली होती । त्यामुळे या दोन मित्रांनी गावातील लोकांना सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले ।  गावात सरकारी कामांत होत असलेल्या भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आवाज उठविणे सूरू केले ।

आपल्याला जर गावाचा विकास करायचा असेल तर आपल्या हाती सत्ता असणे आवश्यक आहे हे त्यांना समजले होते त्यामुळे सोनु आणि मोनु ने गावाची ग्रामपंचायत निवडणूक लढवली , निवडणूकीत त्यांनी जनतेपुढे विकासाचे मुद्दे लावून धरले पण जनतेने त्यांच्या कडे फारसे लक्ष दिले नाही ।

गावातील लोकांनी ज्या उमेदवारांनी त्यांना दारू पाजली व पैसे दिले अशाच लोकांना ग्रामपंचायतीवर निवडून पाठविले ।

यामुळे सोनु आणि मोनू खुप दुःखी झाले ।

त्यांना करायचा असलेल्या गावाच्या विकासाचे स्वप्न भंग पावले होते ।

पण त्यांनी अजिबात जिद्द हरलेली नव्हती ।

परत पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक आली यावेळी त्यांना काहीही करून निवडणूक जिंकायचीच होती , म्हणून त्यांनी नवीन योजना बनविण्यास सुरूवात केली ।

एके दिवशी असेच नदीजवळ बसले असताना दोघांना एक कल्पना सुचली ।

नंतर दुसऱ्या दिवशी गावातील मुख्य चौकात सोनु आणि मोनु चे एकमेकांसोबत कडाक्याचे भांडण झाले , नंतर शाब्दिक बाचाबाची चे रूपांतर हिंसक झगड्यामध्ये झाले ।

मारामारी झाली , दोघेही जखमी झाले ।

भांडण सोडविण्यासाठी लोकं जमा झाले व त्या भांडणामुळे सोनु च्या धर्मातील बांधव सोनु च्या बाजूने बोलु लागले व मोनु च्या धर्मातील लोक त्याच्या बाजूने असा वेगळा गट पडला ।

सोनु आणि मोनु च्या संबंधात वितुष्ट निर्माण झाले त्यामुळे ते एकमेकांचा अतिशय राग करत ।  पुढे ते निवडणूकीत उभे राहिले व एकमेकांच्या धर्माविषयी टीका टिप्पणी करू लागले यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाली व गावातील लोक एकमेकांच्या धर्माचा राग करू लागले ।

अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने सोबत राहणारे लोकं एकमेकांचा द्वेष करू लागले होते ।

यामुळे दोघांनाही भरपूर प्रसिद्धी मिळाली व ते आपापल्या वार्डातून निवडणूक जिंकले ।

सुरुवातीला सोनु च्या हातात सत्ता होती , मोनु विरोधी पक्षात होता । नंतर समोरच्या निवडणूकीत मोनू सत्तेत आला अशी समीकरणे बदलत गेली ।

आपल्याचं धर्माचा नेता सरपंच असावा असेच गावकऱ्यांना वाटे त्यामुळे फक्त आपल्या धर्माच्या माणसालाच मत देत होते  आणि बाकी शिक्षण ,प्रगती इतर मुद्द्यांचे लोकांना काहीही देणेघेणे नव्हते कारण विकासापेक्षा त्यांना धर्म महत्त्वाचा होता ।

निवडणूक आली की गावात दंगली होत , किंवा कुठलेतरी धार्मिक कारस्थान केले जाई ज्यामुळे लोक आपसात विभागले जात व मतदान करताना त्यांचा मुख्य मुद्दा हा धर्म असे ।

इकडे सोनु व मोनु ने मस्त मोठमोठाले वाडे बांधले , चारचाकी गाड्या घेतल्या व गळ्यात सोन्याच्या चेन घालून ते गावात मिरवायला लागले ।

त्यांना सत्ता सुरूवातीला यासाठी हवी होती की त्यांना गावाचा विकास करायचा होता पण जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यांनी फक्त आपले खिसे भरणे पसंत केले ।

लोकांना दुसऱ्या धर्माविरूद्ध भडकविणे व आपले राजकारण चमकविणे ही त्यांचीच योजना होती पण ती योजना कमालीची यशस्वी ठरली ।

ते आपण किती कट्टर दुश्मन आहोत हे लोकांना दाखवत पण त्यांची दोस्ती कधीच तुटलेली नव्हती ।

जेव्हा गावातील लोकांना हे कळले तेव्हा वेळ गेलेली होती किंवा लोक या गोष्टी ला निव्वळ अफवा समजत असत याचा परिणाम असा झाला की ते  दोघेही नेहमी सत्तेत राहून आपला स्वतःचाच विकास करत ।

आता प्रश्न हा आहे कि त्या दोघांना ही सुरूवातीला गावाचा विकास करायचा होता तर मग त्यांनी सत्ता आल्यावर तो का केला नाही ?

तर याचे उत्तर असे आहे की गावातील लोकचं  या विकासाबद्दल उत्साही नव्हते मग ते का  करतील ? कारण लोकांना फक्त आपल्या धर्माचे सरकार हवे होते , ते सरकार काय काम करते याचे त्यांना काहीही देणेघेणे नसायचे ।

आणि एक खरी गोष्ट म्हणजे जेव्हा माणसाचे स्वतः चे पोट रिकामे असते तेव्हाच  तो इतरांचा, समाजाचा विचार करतो पण जेव्हा त्याचे पोट भरते तेव्हा लोकांचा विचार करणे त्याला कंटाळवाणे वाटत असते ।

या गावातील लोकांच्या परिस्थिती सारखीच संपूर्ण जगातील लोकांची परिस्थिती झालेली आहे , दुसऱ्या धर्माचा ,जातीचा , दुसरी भाषा बोलणारा माणूस वाईट व आपल्या धर्माचा मग तो चोर, बलात्कारी का असेना तो चांगला अशी वाईट अवस्था या प्रुथ्वीवर होताना दिसत आहे ।

मुळात ज्या मुद्द्यावर आपण भांडतो ते धर्म ,अधर्म म्हणजे काय ?

तर जो माणूस सत्याची , न्यायाची बाजू घेतो तो धर्माच्या बाजूने असतो

व जे चुकीचे , अन्याय करणार्या गोष्टी असतात ते अधर्म असते ।

चांगला किंवा वाईट होण्यासाठी कोणत्या एका विशिष्ट धर्मात किंवा समूहात जन्म घेणे आवश्यक नाही तर माणूस हा त्याच्या कर्मानेच हे ठरवत असतो ।

म्हणून द्वेष सोडा व लोकांना प्रेम द्या तरचं आपण आपल्या मानवी जीवनाचा चांगला अनुभव घेऊ शकणार ।

एकदा एका गावात एक चांगला नावाजलेला माणूस राहायचा तो माणूस एका विशिष्ट जातीचा खूप राग करत होता कारण त्याला कोणीतरी सांगितले होते की त्या जातीचे लोकं खुप वाईट असतात म्हणून ।

तो व्यक्ती त्या अमुक तमुक जातीच्या लोकांशी अजिबात बोलायचा नाही व आपल्या घरच्यांनाही बोलू देत नव्हता , आसपासच्या सर्व लोकांना त्या माणसाचा त्या अमुक जातीच्या लोकांच्या बद्दल असे विचार आहेत हे माहिती झाले होते ।

एके दिवशी त्या व्यक्ती ला माहिती पडले की त्याच्या शहरात नोकरी करणाऱ्या मुलीने त्याच जातीच्या मुलाशी प्रेमविवाह केला आहे ज्या जातीच्या लोकांचा तो अतिशय राग करत होता ।

त्या व्यक्ती ला आपल्या मुलीचा खूप राग आला ,लोकं त्याच्यावर हसत होते पण त्याचा जावई  मोठा अधिकारी होता व त्याचा मुलीला खूप खुष ठेवायचा ।

नंतर काही दिवसांनी या व्यक्तीला वाटले की मुलीला जाऊन भेटावे , नातवाचा चेहरा बघावा पण तो गेला नाही कारण त्याची खोटी प्रतिष्ठा व लोकं काय म्हणतील या भितीनेच तो नाही गेला ।

आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत त्याच्या जावयाने त्याच्याविषयीचे सर्व कर्तव्ये पार पाडली व त्याची खूप सेवा केली , शेवटी जाता जाता त्या व्यक्तीच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडले , ते होते , “ मी आयुष्यभर एक फालतु गोष्ट घेऊन बसलो होतो व ती समजायला माझे आयुष्य गेले “ ।

मित्रांनो प्रत्येक माणसाला सुर्यप्रकाश ,आँक्सिजन  हे  देताना निसर्ग कुठल्याही प्रकारचा भेद करत  नाही मग आपण माणसे एकमेकांना धर्म, जात, रंग ,भाषा यावरून का भेदाभेद निर्माण करतो व एकमेकांना का वैरी मानतो ? यावर नक्की विचार करा ।

तुम्ही ज्या पण धर्माला मानता त्याचे खर्या अर्थाने अभ्यासक बना , कोणी सांगते म्हणून नाही तर स्वतः वाचन करा कारण कोणताही धर्म दुसऱ्यावर टीका करायला , दुश्मनी करायला सांगणार नाही . धर्म तर माणसे जोडण्यासाठी असतो माणसे दुरावण्यासाठी नाही ।

स्वतः मध्ये आजचं परिवर्तन करा , कारण कोणाही सोबत असं होऊ नये की तो आयुष्यभर एक चुकीची गोष्ट आपल्या मनात ठेवून जगेल ।

धन्यवाद , आवडले तर नक्की शेयर करा

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: