#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक ।

तुम्ही बघितलं असेल बरीच मुले शिकून खूप सारे पैसे खर्च करून आयुष्यात काहीच होत नाहीत त्यांना नोकरी मिळविणे ही कठीण जाते ,.जर कदाचित नोकरी मिळालीच तर कुटुंबाचा गाडा चालविता चालविता त्यांच्या नाकी नऊ येतात ।

मग आपल्या तुटपुंज्या पगारात कसेबसे संसार चालवून कधी आपले प्रमोशन होईल? , कधी पगार वाढेल ? किंवा कधी मी कर्जमुक्त होईल ही स्वप्ने अशी लोकं बघत असतात अशा लोकांची संख्या या दुनियेत खूप जास्त आहे ।

दुसऱ्या प्रकारची लोक असतात ज्यांना शिक्षणात जास्त स्वारस्य नसते पण असे लोक एखाद्या वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून आपले संपत्तीचे साम्राज्य निर्माण करतात कारण त्यांना माहीती असते की आपण शिक्षणात कमजोर असल्यामुळे चांगली नोकरी आपल्याला सहजासहजी मिळणार नाही त्यामुळे ते सुरूवातीलाच आपला वेगळा मार्ग निवडतात ।

जे लोकं आपले लहानपण अत्यंत गरिबीच्या किंवा हलाखीच्या परिस्थिती मध्ये काढतात त्यांच अर्थ शास्त्र खूप मजबूत झालेले असते , पैशाची गरज किंवा पैशाचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे गरिबी पाहिलेल्या लोकांना लवकर कळते ।

उलट जी लोकं ज्यांना हवी ती वस्तू लहानपणापासून दिली जाते ते या बाबतीत मागे असतात ।

म्हणून तर प्रत्येक क्षेत्रातील मोठमोठी माणसे बघितली तर ते एखाद्या सामान्य घरातून आलेली आपल्याला दिसतील ।

सांगायचा मुद्दा असा की माणूस हा जास्त शिकला म्हणजे तो जास्त प्रगती करतो असे होतेच असं नाही ।

इथे प्रगती म्हणजे आर्थिक प्रगती ।

कधी कधी लोकांकडे भरपूर पगार असूनसुद्धा ते पैसा साठवू आणि वाढवू शकत नाहीत कारण त्यांनी स्वतः चे खर्च इतके वाढवून ठेवलेले असतात की त्यांना पैसे कसे वाचवावे हेच कळतं नाही ।

शाळेत आपल्याला जे शिक्षण मिळते ते पुस्तकी प्रकारचं असत व त्याचा आपल्या आयुष्यात फायदा होतो हे सर्वांना माहिती आहेच पण शाळेच्या शिक्षणापेक्षा आपल्या आयुष्यातील अनुभवांतून आणि प्रसंगातून जे दुनियादारी चं शिक्षण मिळते ते आयुष्य घडविण्यासाठी खूप कामी पडत असतं ।

आज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाल तर तुम्हाला अशी भरपूर माणसे भेटतील की ज्यांना आर्थिक समस्या आहेत या आर्थिक समस्यांमुळे लोकांच्या आयुष्याची पार वाट लागलेली असते कारण त्यांनी आयुष्यात हवं असलेलं अर्थविषयक ज्ञान विकसित केलेले नसते ,  या गोष्टी अगदी चांगल्या चांगल्या पैसेवाल्या व्यक्ती सोबतही होतात , आपण कमवित असलेला पैसा कुठे जातो हेच लोकांना कळत नाही ।

या परिस्थितीवर खूप वर्षापूर्वी एका राँबर्ट कियोसाकी नावाच्या लेखकाने एक पुस्तक लिहिलेले आहे , त्या पुस्तकाचे नाव आहे rich dad poor dad. या पुस्तकाचे मराठी संस्करण सुद्धा उपलब्ध आहे .

https://www.amazon.in/gp/product/8183220371/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=gattubaba9503-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=8183220371&linkId=cd44335e53e1c5ca31a6bf8b11c2febb

लिंक दिलेली आहे ।

तर यामध्ये राँबर्टचे वडील हे उच्च विद्याविभूषित व  सरकारच्या नोकरीत असूनसुद्धा त्यांना आयुष्यात खूप आर्थिक समस्या असतात , ते खूप काम करतात पण त्यांच्या आयुष्यात नेहमी आर्थिक अडचणी असतात  । लेखकाचे उच्च विद्याविभूषित वडील हे  poor dad असतात ।

तर राँबर्ट चा एक मित्र असतो माइक , माइक चे वडील कमी शिकलेले असतात व त्यांचे घर अत्यंत साधे असते पण आर्थिक बाबतीत ते अतिशय हुशार असतात , ते अनेक दुकानांचे मालक असतात व त्यांचा जीवनाकडे बघण्याचा द्रष्टीकोन अतिशय सकारात्मक असतो , नंतर ते हवाईतील  सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतात ।

तर राँबर्ट चा एक मित्र असतो माइक , माइक चे वडील कमी शिकलेले असतात व त्यांचे घर अत्यंत साधे असते पण आर्थिक बाबतीत ते अतिशय हुशार असतात , ते अनेक दुकानांचे मालक असतात व त्यांचा जीवनाकडे बघण्याचा द्रष्टीकोन अतिशय सकारात्मक असतो , नंतर ते हवाईतील  सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतात ।

तर हे माइकचे वडील हे rich dad असतात ।

हे दोन्ही वडील लेखकाला वेळोवेळी आयुष्यात मार्गदर्शन करतात व लेखक या दोघांच ऐकतो पण आयुष्याला विकसित करण्यासाठी त्यांना rich dad चे विचार जास्त पटतात म्हणून ते त्यांच्या विचारांना प्राधान्य देतात ।

दोघांचे सल्ले आणि विचार वेगवेगळे असतात जसे ,

Poor dad म्हणतात की आयुष्यात सगळ्या समस्या निर्माण होण्याला कारण म्हणजे पैसा तर

Rich dad म्हणतात की  आयुष्यात समस्या या पैश्यामुळे निर्माण होत नाहीत तर त्या पैसा नसल्यामुळे किंवा पैशाच्या कमतरतेमुळे निर्माण होतात ।

Poor dad दान करायला मागेपुढे बघतात कारण त्यांच्या कडे अतिरिक्त पैशाचा नेहमी तुटवडा असतो तर

Rich dad म्हणतात की आपण जेवढे सढळ हातानी दान करतो तेवढेच ते आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात परत येते ।

तर अश्या अनेक जीवन बदलविणार्या गोष्टी या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतील ।

पुस्तकाची कहाणी ।

राँबर्ट आणि माइक हे एकाच शाळेत शिकतात ते चांगले मित्र असतात , एके दिवशी त्यांचा एक श्रीमंत वर्गमित्र पिकनिक ला जातो आणि तो आपल्या सारख्याच श्रीमंत मित्रांना सोबत घेऊन जातो पण राँबर्ट आणि माइकला सोबत नेत नाही ।

माइक ही सुरूवातीला जास्त श्रीमंत नसतो त्याचे वडील जे कथेत rich dad आहेत ते तेव्हा श्रीमंतीकडे वाटचाल करीत असतात ।

पिकनिक ला न नेल्याचे कारण म्हणजे आपण त्यांच्या पेक्षा गरीब आहोत असे  या दोघांना आपसातल्या चर्चेतून समजते ।

ती गोष्ट मनाला लागल्यामुळे आपण लवकर श्रीमंत बनावे असे त्यांना वाटते ।

एके दिवशी राँबर्ट आणि माइक आपल्या सोसायटीतल्या व आसपासच्या घरातून रिकाम्या झालेल्या टूथपेस्ट च्या कांड्या जमा करतात ,  त्यावेळी टूथपेस्ट हे शिशाच्या पँकमध्ये यायचे ते खाली शिशाचे पँकेट जमा करून त्याला पिघलवून ते राँबर्ट च्या घरी त्यापासून नाणी पाडण्याचे काम करीत असतात ।

राँबर्ट च्या वडीलांना तो जळण्याचा धूर दिसतो तर त्यांना आपली लहान मुले काय करत आहेत हे समजते ।

राँबर्ट चे वडील यावर हसतात व ते म्हणतात की तुम्हा मुलांना माहिती आहे का हे काम बेकायदेशीर आहे म्हणून ?

मुलांचे वय अतिशय कमी असल्यामुळे ते मुलांना प्रेमाने समजवितात ।

तेव्हा ती मुले अवघ्या 9 वर्षांची असतात ।

आम्ही श्रीमंत होण्यासाठी हे करीत आहोत असे मुलांचे म्हणणे असते पण वडीलांनी समजविल्यावर राँबर्ट त्यांना प्रश्न करतो की , “बाबा तुम्ही आम्हाला श्रीमंत कसं व्हायचं हे शिकवालं का ?”  

पण याचं उत्तर त्याच्या वडीलांकडे नसतं ।

त्याचे वडील माइक च्या वडीलांकडे जा ते तुम्हाला सांगतील असा सल्ला त्या मुलांना देतात आणि खरं म्हणजे आपले वडील पैसे कमविण्यात एवढे हुशार आहेत हे माइक ला ही तोपर्यंत माहिती नसतं ।

माइकचे वडील म्हणजे rich dad  त्या मुलांना श्रीमंत कसं व्हायचं हे शिकवायला तयार होतात व त्यांना आपल्या दुकानात सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याचे सांगतात व त्याच्या मोबदल्यात काही पैसे ही देवू करतात ।

काम चालू झाल्यावर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आर्थिक समस्यांना कसे तोंड द्यायचे या गोष्टी rich dad त्यांना प्रसंगातून समजावून सांगत असतात ,.हे करताना ते त्या मुलांशी प्रसंगी कठोर वागतात ,.आपण हे रटाळवाणे काम सोडून द्यावे असेही राँबर्ट आणि माइक ला वाटते पण ते नंतर पुन्हा रूजू होतात ।

नंतर  rich dad पगारवाढी च्या हट्टामुळे त्यांचा कामाचा जुना  मोबदला ही  बंद करतात तेव्हा ती फुकटात  कामं करणारी मुले पैशाच्या टंचाईमुळे माइक च्या घरी एक जुन्या पुस्तकांची लायब्ररी चालू करतात आणि बर्यापैकी कमाई करतात ,.ही आयडीया त्यांना दुकानातल्या रद्दी मुळे येते ।  rich dad आपल्याशी कठोर वागून आपल्याला खूप बहुमूल्य गोष्टी शिकवित आहेत हे मुलांना लक्षात येते मग ते त्यांचे सल्ले काळजीपूर्वक ऐकतात ।

राँबर्ट नंतर मोठा होऊन दोन तीन चांगल्या मोठमोठ्या ठिकाणी नोकर्या करतो व नंतर  यशस्वी उद्योजक सुद्धा होतो, त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयात rich dad त्याला मोलाचे मार्गदर्शन करतात ।

माइक मोठा होऊन आपल्या वडीलांचा मोठा व्यवसाय सांभाळतो ।

Rich dad चं ऐकत असतानाच राँबर्ट आपल्या poor dad चं चांगले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न ही पूर्ण करतो ।

Rich dad त्याला अश्या ठिकाणी नोकरी करण्याचा सल्ला देतात जिथून त्याला आपल्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी काहीतरी शिकायला मिळेल ।

नंतर तो शेवटी एक यशस्वी उद्योजक बनतो ।

राँबर्ट हा सतत काहीतरी नवीन शिकण्यावर भर देत असतो , मित्रांनो rich dad poor dad  हे पुस्तक नक्की वाचा तुमची जीवनात आर्थिक प्रगती जर होत नसेल किंवा खूप सारा पैसा कमवूनही  तो वाचवु शकत नसाल तर हे पुस्तक तुम्हाला वाचण्याची खूप गरज आहे ।

मी जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हा पुस्तक पब्लिश झाल्यानंतर मी एवढ्या ऊशीरा का वाचले ?याचीच खंत मनात होती ।

माझे आयुष्य त्या पुस्तकाने बदलविण्यास खूप मदत केली व आपल्या आर्थिक नियोजनात काय चुका होत्या याचीही जाणीव झाली ।

आयुष्यात प्रगती करायची असेल तर ज्यामधून काही तरी बोध घेता येईल असे साहित्य नेहमी वाचा ,.फालतु गोष्टी वर फुकट वेळ घालविण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचणे केव्हाही चांगले ।

धन्यवाद ।

https://www.amazon.in/gp/product/8183220371/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=gattubaba9503-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=8183220371&linkId=cd44335e53e1c5ca31a6bf8b11c2febb

पुस्तकाची लिंक वरती दिलेली आहे ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: